शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

उदयनराजेंसह ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Updated: April 8, 2015 00:35 IST

३८५ अर्जांची विक्री : वाई, फलटण, सातारा ‘सोसायटी’तील अर्ज आज दाखल होणार

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार प्रभाकर घार्गे, राजेश पाटील, सुरेंद्र गुदगे, सुनील माने, विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे, प्रकाश बडेकर यांच्यासह ४४ उमेदवारांनी ६४ अर्ज दाखल केले. आजअखेर ५७ उमेदवारांनी ८४ अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज, बुधवार शेवटचा दिवस आहे. मंगळवारअखेर तब्बल ३८५ अर्जांची विक्री झाली असल्याने शेवटच्या दिवशी प्रमुख मंडळींसह इतर अर्ज मोठ्या संख्येने जमा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे (महाबळेश्वर, २ अर्ज), मानसिंग जगदाळे २ अर्ज, दत्तात्रय जाधव, दीपक पाटील, धनंजय पाटील प्रत्येकी १ अर्ज (कऱ्हाड), दिलीप चव्हाण, शंभूराज देसाई प्रत्येकी १ अर्ज, विक्रमसिंह पाटणकर ३ अर्ज (पाटण), सुनील माने, श्रीरंग भोईटे प्रत्येकी २ अर्ज, सुरेश गायकवाड, शहाजी भोईटे प्रत्येकी १ अर्ज (कोरेगाव), आमदार प्रभाकर घार्गे ५ अर्ज, नामदेव गोडसे १ अर्ज (खटाव), मनोजकुमार सदाशिव पोळ २ अर्ज, रामचंद्र बापूसाहेब माने १ अर्ज (माण), बकाजीराव पाटील २ अर्ज (खंडाळा) दाखल झाले. नागरी बँका, पतसंस्था मतदारसंघ : राजेश विलासराव पाटील २ अर्ज, प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे, रामराव लेंभे, नानासो मोरे, भास्करराव गुंडगे, रविराज देसाई प्रत्येकी १ अर्ज. गृहनिर्माण : खासदार उदयनराजे भोसले २ अर्ज, रविराज देसाई १ अर्ज. अनुसूचित जाती-जमाती : प्रकाश बडेकर २ अर्ज, सुरेश गायकवाड, अरुण पवार, बबन भिसे प्रत्येकी १ अर्ज. इतर मागास प्रवर्ग : प्रदीप विधाते, सुरेंद्र गुदगे. भटक्या जमाती : अर्जुन खाडे, भास्करराव गुंडगे २ अर्ज. महिला राखीव : गीतांजली कदम, कांचन साळुंखे प्रत्येकी २ अर्ज, निर्मला चव्हाण, वैशाली फडतरे प्रत्येकी १ अर्ज. औद्योगिक विणकर : अनिल देसाई, विक्रमबाबा पाटणकर प्रत्येकी २ अर्ज, जयवंतराव जंबुरे, रविराज देसाई, जयसिंग जाधव प्रत्येकी १ अर्ज दाखल झाले. दरम्यान, मंगळवारी ८४ अर्जांची विक्री झाली. दरम्यान, मंगळवारी उदयनराजेंचा अर्ज भरताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. डी. जी. बनकर, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, गीतांजली कदम व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उदयनराजेंच्या एका अर्जावर माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी सूचक म्हणून, तर सचिन नलावडे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे, तर दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून धनंजय बर्गे व अनुमोदक म्हणून धनसिंग कदम यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. दोघेही कोरेगाव तालुक्यातील आहेत. (प्रतिनिधी)बाळासाहेब पाटलांचा अर्ज ‘कृषी प्रक्रिया’मधूनगत निवडणुकीत कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पाणीपुरवठा गृहनिर्माण मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.या निवडणुकीत मात्र बाळासाहेब पाटील यांनी कृषी उत्पादन प्रक्रिया सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. उदयनराजेंनी अर्ज दाखल करण्यासाठी आपला मतदारसंघ कायम ठेवला आहे.