शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मेढ्यात ४३ जातींची रोपे आपल्या दारी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:43 IST

मेढा : आपण राहत असलेल्या परिसरात झाडे लावावीत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडूनही तयारी केली जाते; पण ...

मेढा : आपण राहत असलेल्या परिसरात झाडे लावावीत, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडूनही तयारी केली जाते; पण रोपे आणण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या नर्सरीपर्यंत जाऊ शकत नाही. याची जाणीव ठेवून सामाजिक वनीकरण विभागाने मेढा येथे ‘रोपे आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम ठेवला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.शासनाच्या ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र झाडे लावली जात आहेत. सामाजिक वनीकरण विभागानेही त्यांच्या रोपवाटिकेत मोठ्या संख्येने रोपे तयार केली आहेत. सर्वसाधारणपण जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला असतो. आताच रोपे लावली तर जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात रोपांना मागणी जास्त असते अन् या विभागाकडूनही सवलतीच्या दरात रोपे दिली जातात.आपला कामधंदा सोडून प्रत्येकजण सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत जाऊ शकत नाही, त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही वेळ मिळाला नाही म्हणून रोपे लावण्याचे राहून जाते, असे होऊ नये म्हणून मेढा येथील चौकात एक स्टॉल ठेवला आहे.या ठिकाणी बांबू, साग, शेवगा, काजू, जांभूळ आदी विविध प्रकारच्या ४३ जातींची रोपे ठेवली आहेत, त्यामुळे ग्रामस्थांना चांगली सोय झाली आहे. येथून रोपे घेऊन जात आहेत.या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना झाडे कशी लावायची? सर्वसाधारण किती मोठा खड्डा असावा? खते कशी घालायची? याबाबत वनकर्मचारी शास्त्रशुद्ध माहिती देत असतात. वृक्ष लागवडीसोबतच लोकांना वृक्ष संवर्धनाविषयीही मार्गदर्शन केले जात आहे.वृक्षारोपणाविषयी जनतेतून जागृती व्हावी, यासाठी मेढा येथे सामाजिक वनीकरणकडून शनिवार, दि. २० रोजी वृक्षदिंडीही काढण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.निवडीविषयी मार्गदर्शनया स्टॉलवर आपल्या परिसरात उगवतील असेच रोपे आहेत. मात्र अनेकांना कोणती घ्यावीत, याचा अंदाज येत नाही. अशावेळी झाड कोठे लावणार आहात? दारात, शेतात याची माहिती घेतली जाते. त्यानुसार त्यांना पर्याय सूचविले जातात, अशी माहिती मेढा येथील सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल महांतेश बगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.