शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात ४२ हजार ५०० रोपांची लागवड

By admin | Updated: June 20, 2016 00:21 IST

कऱ्हाड तालुका : १ जुलै रोजी वनविभागाच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रम; बैठकीत निर्णय

कऱ्हाड : वनमहोत्सव कालावधीत शासनाने दि. १ जुलै रोजी राज्यात किमान दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तालुक्यांनाही वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्ये दिले आहे. त्यानुसार कऱ्हाड तालुका वनविभाग १ जुलै रोजी एकाच दिवशी ४२ हजार ५०० वृक्षांची लागवड करणार आहे. वाढत्या वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यासाठी कडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी वनविभागाच्या वतीने वृक्षलागवड व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडही केली जाते; मात्र त्याची निगा राखली जात नाही. यावर उपाय म्हणून शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. १ ते ७ जुलै या कालावधीत सर्वत्र वृक्षलागवड करण्यात येणार आहे. दि. १ जुलै यादिवशी राज्यात एकाच दिवशी वृक्षलागवड केली जाणार आहे. शासनाने प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शासकीय कार्यालयांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ते वृक्षलागवड केल्यानंतर त्याचे जतनही करणे आवश्यक आहे. या वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत नुकतीच कऱ्हाड तालुका प्रशासनाची बैठक येथील पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत कऱ्हाडचे परिक्षेत्र वन अधिकारी बी. एस. शिंदे, तहसीलदार राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी किशोर पवार यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना वृक्षलागवडीबाबत माहितीही दिली. कऱ्हाड वनविभागातर्फे दि. १ जुलै रोजी ४२ हजार ५०० रोपे लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड बंधनकारक ! शासनाच्या नियमानुसार शासकीय सेवेत असलेल्या प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना वृक्षलागवड करणे बंधनकारक असणार आहे. त्यांनी वृक्षलागवड करून त्याची निगा राखणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या वृक्षलागवडीचे परीक्षण हे शासकीय सर्वेक्षण पथकाकडून केले जाणार असल्याची माहिती नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली. असा आहे वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाच्या दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हा दि. १ जुलैला आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित शासकीय विभागांनी तसेच ग्रामपंचायतीनी २५ जूनपर्यंत वृक्षारोपणासाठी खड्डे खोदणे गरजेचे आहे. त्यानंतर २५ जूननंतर संबंधित विभागांना वनविभागातर्फे वृक्ष दिले जाणार आहे. व त्यानंतर १ जुलै रोजी सर्वत्र वृक्षलागवड कार्यक्रम राबविला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या फोनवर वृक्षलागवड संदेशाचे रिंगटोन ‘चला चला रे एक हाती निर्धार करूया, वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडे लावू या, एक जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम हाती घेऊया,’ अशा संदेशाचे वृक्षलागवडीचे रिंगटोनही वनविभागातील प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना फोन लावण्यास ऐकायला मिळत आहेत. वृक्षलागवडीची ठिकाण व संख्या १) हणबरवाडी परिसर - २४ हजार, २) कोरिवळे परिसर - ११ हजार, ३) धोंडेवाडी परिसर - ७ हजार ५०० वृक्षलागवड कार्यक्रमास वीस विभागांचा सहभाग ४महसूल विभाग ४पशुसंवर्धन विभाग ४नगरविकास विभाग ४सहकार व पणन विभाग ४सांस्कृतिक कार्य, पर्यटन विभाग ४उच्च व तंत्र शिक्षण विभाग ४गृह विभाग ४प्रादेशिक परिवहन विभाग ४महाराष्ट्र उद्योग विभाग महामंडळांतर्गत प्रत्येक कारखाने, संस्था ४विद्युत पारेषण केंद्रे ४विधी व न्याय विभाग ४सार्वजनिक आरोग्य विभाग ४सार्वजनिक बांधकाम विभाग ४ग्रामविकास विभाग ४जलसंधारण विभाग ४शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ४जलसंपदा विभाग ४सामाजिक न्याय विभाग ४कृषी विभाग