शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

४२ रुग्णालये ‘धर्मादाय’च्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:18 PM

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जी रुग्णालये आपली धर्मादाय अथवा चॅरिटेबल ओळख लपवत आहेत, अशी ४२ रुग्णालये जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या हिटलिस्टवर आहेत. या रुग्णालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात सेवा दिली नसेल तर त्यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम कायदा १९५० कलम ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जी रुग्णालये आपली धर्मादाय अथवा चॅरिटेबल ओळख लपवत आहेत, अशी ४२ रुग्णालये जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या हिटलिस्टवर आहेत. या रुग्णालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात सेवा दिली नसेल तर त्यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम कायदा १९५० कलम ४१ क नुसार कारवाई केली जाणार आहे.धर्मादाय अथवा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये निर्धन तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार केले जातात. संबंधित हॉस्पिटलचे वर्षभरातील आर्थिक व्यवहार पाच लाखांच्या वर आहेत, त्यांनी ‘आयडीएफ’ फंडाच्या बँक खात्यात उत्पन्नातील दोन टक्के निधी जमा करायचा असतो. रुग्णालयातील एकूण खाटांपैकी दहा खाटा निर्धन लोकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. जमा होणाऱ्या आयडीएफ खात्यातील रकमेवरच रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जातात.धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असलेली १६ रुग्णालये सेवा पुरवत आहेत. नियमानुसार ८५ हजारपेक्षा कमी उत्पन्न असणाºया निर्धन गटातील व्यक्तींवर या रुग्णालयात मोफत उपचार करणे सक्तीचे आहे. तसेच १ लाख ६० हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणाºया दुर्बल घटकातील लोकांवर ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. यासाठी रुग्णाचे केशरी, पिवळे रेशनकार्ड व तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखल आवश्यक असतो.धर्मादाय आयुक्त कार्यालयात ट्रस्टची नोंदणी करून जिल्ह्यात अनेकजण रुग्णालये चालवित आहेत. यापैकी १६ रुग्णालये नोंदीनुसार उपचार करत आहेत. मात्र इतर अनेक रुग्णालये आपली ओळख लपवून गरिबांना सवलत देण्यामध्ये टाळाटाळ करताना दिसत आहेत. रुग्णालय उभे करताना ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सवलतींचा लाभ घ्यायचा; मात्र नंतर आपली ओळख लपवून नफेखोरीचा धंदा करायचा, असे प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत, त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाने कटाक्ष टाकला आहे.सातारा जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाख ३ हजार ७४१ इतकी आहे. जिल्ह्याचा विस्तारही मोठा आहे. त्यामुळे साहजिकच सेवा पुरविणाºया १६ रुग्णालयांवर याचा भार आहे. याव्यतिरिक्त ट्रस्टची नोंद करून रुग्णांना सवलतीचा लाभ न देणारे ४२ दवाखाने जिल्ह्यात कार्यरत असल्याचा अंदाज असून, त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे काम धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सुरू केले आहे. या रुग्णालयांनी ओळख लपवली असल्यास जेव्हापासून त्यांची नोंद ट्रस्ट म्हणून झाली आहे, तिथपासून आयडीएफ फंडाची वसुली केली जाणार आहे. दरम्यान, जे रुग्णालय चालक याला विरोध करतील, त्यांचे परवाने रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.जिल्ह्यातील या रुग्णालयांत मोफत उपचारकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृष्णा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कºहाड, कृष्णामाई मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन, फलटण, निकोप हॉस्पिटल, रिंगरोड फलटण, आयुर्वेद प्रसारक मंडळ संचलित आर्यांग्ल हॉस्पिटल सातारा, डॉ. मो. ना. आगाशे धर्मादाय रुग्णालय व प्रसूतीगृह शुक्रवार पेठ, सातारा, कºहाड लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट कºहाड संचलित श्रीयुत रामकिसन लाहोटी नेत्र रुग्णालय, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट, पुणे संचलित कमला मेहता आय हॉस्पिटल, शिरवळ, समर्थ एज्युकेशन ट्रस्ट संचलित समर्थ हॉस्पिटल सावकार होमिओपॅथिक रुग्णालय, छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित रुरल इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल मायणी, ता. खटाव, चैत्यउपासना ट्रस्ट पुणे संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान गोंदवले बुद्रुक, चैतन्य रुग्णालय, गोंदवले, सेवा मेडिकल फाउंडेशन पुणे संचलित जोगळेकर हॉस्पिटल व प्रसूतीगृह शिरवळ, ता. खंडाळा, आयुर्वेद प्रसारक मंडळ, फलटण संचलित श्रीमंत मालोजीराजे सिल्व्हर हॉस्पिटल महात्मा फुले चौक, फलटण, कै. कृष्णा श्रीपती घोरपडे मेमोरियल फाउंडेशन पुणे संचलित निरामय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जिल्हा परिषदेजवळ, सातारा, लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट फलटण संचलित मुधोजी आय हॉस्पिटल, लक्ष्मीनगर, तेलंग हॉस्पिटल इमारत, फलटण, मराठी मिशन संचलित विलीस फेअर बँक पिअर्स मेमोरियल हॉस्पिटल, सोनगिरवाडी, वाई, जी. के. गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट कºहाड संचलित जी. के. गुजर मेमोरियल सह्याद्री हॉस्पिटल, यशवंतनगर कारखाना कंपाऊंड, कºहाड. लायन्स क्लब सातारा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स नॅब नेत्र रुग्णालय, राधिका रोड, सातारा, कनिष्का ज्ञानपीठ आरोग्य संस्था सातारा संचलित कनिष्का मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सातारा या रुग्णालयांत ८५ हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणाºया लोकांवर मोफत उपचार होतात. तसेच १ लाख ६० रुपयांपर्यंत ५० टक्के सवलतीच्या दरात उपचार केले जातात.रुग्णालयांच्या नावांमध्येधर्मादाय शब्द सक्तीचाधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या रुग्णालयांच्या नावांमध्ये धर्मादाय किंवा चॅरिटेबल हा शब्द असणे सक्तीचा आहे. या रुग्णालयांमध्ये गरिबांवर मोफत उपचार केले जातात. संबंधित रुग्णालय हे धर्मादाय अथवा चॅरिटेबल आहे का? हा संभ्रम दूर करण्यासाठी रुग्णालयाच्या नावातच हे शब्द घालण्याबाबत रुग्णालय चालकांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने लेखी सूचना केल्या आहेत.