शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाबळेश्वरातल्या ४00 टॅक्सी चालकांचे साताऱ्यात धरणे

By admin | Updated: June 30, 2017 15:26 IST

नवीन मीटर परवाने बंद करण्याची मागणी : १00 वाहनांचा ताफा धडकला आरटीओ कार्यालयात

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. ३0 : महाबळेश्वरात नवीन काळी-पिवळी टॅक्सी परवाने देऊ नयेत, या प्रमुख मागणीसाठी महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यवसायिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. महाबळेश्वरातील ४00 टॅक्सी चालक १00 टॅक्सी घेऊन साताऱ्यात धडकले होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांची भेट घेऊन संघटनेतर्फे त्यांना निवेदन देण्यात आले. कार्यालय परिसरात ४00 टॅक्सी चालक एकत्र जमल्याने पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.राज्य शासनाने १९९७ साली बंद केलेले टॅक्सी परवाने खुले करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महाबळेश्वरातील टॅक्सी व्यवसाय धोक्यात येणार आहे. महाबळेश्वर येथे महाबळेश्वरात २00१ पासून २0१७ अखेर ३७९ काळी पिवळी टॅक्सी आहे. टुरिस्ट परवाने असलेली ६00 वाहने आहेत. अलीकडच्या काळात पर्यटकही स्वत:ची वाहने घेऊन मोठ्या संख्येने येत असतात. जे पर्यटक बसने येतात, असेच टॅक्सीने महाबळेश्वर दर्शत घेतात. येथील पाँर्इंटवर जाणारे सर्व रस्ते अरुंद आहेत, तसेच वाहनतळाची मोठी गैरसोय आहे. दिवाळी, नाताळ, उन्हाळी हंगामातच टॅक्सीला व्यवसाय मिळतो व इतर बिगर हंगामात टॅक्सीला व्यवसाय मिळत नाही. अनेकांनी कर्ज काढून टॅक्सी घेतली आहे. ती कर्ज सुध्दा फिटत नाहीत. त्यामुळे हा व्यवसाय करणारे टॅक्सी व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. अशा स्थितीत राज्य शासनाने टॅक्सीचे परवाने सरसकट खुले केले आहेत, त्यामुळे येथे टॅक्सींची संख्या वाढणार आहे. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना उपासमारीला सामोरे जावे लागणार आहे. या परिस्थितीत शासनाने टॅक्सी परवाने खुले करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बावळेकर, उपाध्यक्ष अफजल मुलाणी, जनरल सेक्रेटरी अशोक ढेबे यांनी यावेळी बोलताना दिला. 

...तर वाहने अन परवानेही आरटीओकडे जमा करु

शासनाने आमच्या मागणीचा विचार केला नाही, तर आमची वाहने आणि परवाने आरटीओकडे जमा केली जातील. वेळप्रसंगी उच्च न्यायालयातही जाण्याचा विचार केला असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनावेळी सांगितले. 

महाबळेश्वरात पर्यटकांना टॅक्सी कमी पडत नाहीत. तरीही टॅक्सीला नवीन परवाने देण्याचा घाट शासनाने घातला आहे. वास्तविक, महाबळेश्वर व परिसर इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये येत नसल्याने रस्त्यांचे रुंदीकरण होत नाही. सध्या असणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे, त्यातच परवाने दिले तर आणखी वाहनांची भर पडून वाहतूक कोंडी व इतर प्रश्न निर्माण होतील. महाबळेश्वर तालुक्यापुरता नवीन परवाने देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा. - सी. डी. बावळेकर, अध्यक्ष, महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटना