शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

७८ जणांच्या आवाजासाठी ४ माईक

By admin | Updated: June 19, 2016 00:53 IST

जिल्हा परिषद : तीन आरक्षित आणि एक ओपन माईक असल्याने महिलांचा आवाज पोहोचलाच नाही

सातारा : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येथील छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. या सभेत ६७ जिल्हा परिषद सदस्य आणि ११ पंचायत समिती सभापतींना बोलावण्यात आले होते. त्यामुळे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात हे सभागृह भरले होते; परंतु या सर्व सदस्य आणि सभापतींसाठी फक्त चारच माईक विषय मांडण्यासाठी ठेवण्यात आले होते. प्रति लाईन तीन माईक सदस्यांनी आरक्षित केले होते. तर एक माईक सर्वांसाठी खुला होता. या परिस्थितीमुळे महिलांचा आवाज सभागृहात घुमलाच नाही. टंचाई निवारण आणि खरीप हंगामाबरोबरच शिक्षणाविषयी सभेत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सदस्य आणि सभापती उपस्थित होते. जो तो आपले विषय मांडून मंजुरी घेण्यसाठी धडपडत होता; परंतु अध्यक्षांपर्यंत आवाज जाण्यासाठी माईकच उपलब्ध होत नसल्याने ‘माईक द्या’ अशी विनवणी करीत होते. उपस्थित सदस्यांसाठी केवळ चारच माईक ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक माईक बाळासाहेब भिलारे, दुसरा माईक दीपक पवार, तिसरा माईक नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे होते. तर एक माईक फिरता होता. त्यामुळे सभेमध्ये या तिघांचे विषय आधी मांडले गेले. त्यानंतर इतरांना एका माईकवर नंबरनुसार विषय मांडण्याची वेळ आली. परंतु या माईकवरही महत्त्वाच्या सदस्यांचा ताबा मिळत असल्याने इतरांना फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागत होती. माईक मिळत नसल्याने काही सदस्य हात ऊंच करून मोठ्याने आपले विषय मांडत होते; परंतु माईकच्या आवाजामुळे त्यांचा आवाज अध्यक्षांपर्यंत पोहोचू शकत नव्हता. दरम्यान, सभेच्या शेवटच्या क्षणी हे तिन्हीही माईक ओपन झाले. आणि इतर सदस्यांना विषय मांडण्यासाठी हाती माईक आले. माईक पुन्हा जाईल, यामुळे प्रत्येक सदस्य अध्यक्षांवर एकापेक्षा एक प्रश्नाचा सपाटा लावत होते. वेळ खूपच कमी राहिला असल्याने अनेकांनी प्रश्नांची खैरात केली; परंतु काहींना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. भागातील अनेक समस्या सोडविण्यासाठी आलेले काही सदस्य केवळ माईक उपलब्ध होत नसल्याने सभेपुढे विषय मांडू शकले नाहीत. सभागृहात बोलणाऱ्या महिलांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. हातात माईक नसल्यामुळे महिलांना आपले मत मांडता आले नाही. हात उंचावूनही महिलांना माईकचा ताबा मिळवता आला नाही.