पाटण : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाच्या ताब्यात असलेले वैद्यकीय बिलाचे ३७ लाखांचे ६ धनादेश गहाळ झाल्याची फोलखोल करून उपसभापतींनी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी हे दोघे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला. धनादेश गहाळप्रकरणी संबंधित लिपिक व गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.सभापती संगीता गुरव यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. शिक्षण विभागातील लिपिक सगरे यांनी धनादेश गहाळ केले. रेखांकित धनादेश गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीचे होते. याबाबत स्पष्टीकरण देताना गटविकास अधिकारी किरण गौतम म्हणाले, ‘कुणी पेन हरविला, धनादेश हरविला हे मी पाहणार नाही. गहाळ झालेल्या धनादेशचे पेमेंट थांबविलेले आहे. याबाबत संबंधित चौकशी होऊन कारवाई होणार आहे. याबाबत सदस्य राजेश पवार यांनी बीडीओंचे कसलेही नियंत्रण नसल्याचा आरोप केला.’ शोभा कदम म्हणाल्या, ‘धनादेश गहाळ होत असतील तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय होणार?’ पाण्यासाठी लोकवर्गणी ७ लाख रुपये जमा केली. आणि शेवटी ते काम रद्द झाले. याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करावी. तसेच पाणेरी येथे पाणीटंचाईत बोअरवेलचे काम करताना नियम डावलून १२० फुटाचीच बोअर काम केले. याबाबत उपसभापती डी. आर. पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता आरळेकर यांना धारेवर धरले. याबाबत राजाभाऊ शेलार, राजेश पवार, विजय पवार यांच्यामध्ये मत भिन्नता आढळली. (वार्ताहर)शेष फंडाबाबत दुजाभावपंचायत समितीच्या १ कोटी ४५ लाखांच्या शेष फंडाचे वाटप करण्यात आले. त्यादरम्यान देसाई गटाचे प्राबल्य असणाऱ्या गणांना डावलण्यात आल्याचा आरोप उपसभापती डी. आर. पाटील यांनी केला. तर तुम्ही केले तेच आम्ही करतोय असे उत्तर राजेश पवार यांनी दिले.पाटण तालुक्यात हवामान थंड असल्यामुळे चहाची लागवड करावी, आॅरगॅनिक शेती करण्यासाठी आपण वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत निधी देऊ. मात्र गावातील शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्याचे काम कृषी विभागाने करावे, असे मत राजेश पवार, राजाभाऊ शेलार यांनी मांडले.
शिक्षण विभागातून ३७ लाखांचे धनादेश गायब
By admin | Updated: June 7, 2016 07:33 IST