शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

३७ कंत्राटी कामगार चार महिने बिनपगारी

By admin | Updated: November 23, 2014 23:47 IST

दिवाळीही झाली कडू : क्षयरोग नियंत्रण पथकातील कर्मचारी हवालदिल

सातारा : क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात काम करत असलेले जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचारी जुलैपासून बिनपगारी काम करत आहेत. त्यांना इतर कोणतेही भत्ते मिळालेले नसल्याने त्यांची दिवाळी कडू झाली असून, दैनंदिन खर्चही भागवणे अवघड झाला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत क्षयरोग नियंत्रण पथकांतर्गत ३७ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, एक वरिष्ठ पर्यवेक्षक, नऊ वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, नऊ वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, चौदा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दोन क्षयरोग एचव्ही, एक डीईओ यांचा समावेश आहे. त्यांचे कंत्राट दरवर्षी नूतनीकरण होत असते; पण वेळेवर पगार होत नसल्याने त्यांच्यासमोर नवीनच समस्या उद्भवली आहे. यासंदर्भात या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील क्षयरोग नियंत्रण विभागातील कंत्राटी कामगारांना वेतन अथवा कोणतेही भत्ते दिलेले नाहीत. गरजेपोटी प्रत्येकी फक्त सात हजार रुपये दिले. ही रक्कम तुटपुंजी असून, वेळेवर वेतन न मिळाल्याने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक, शारीरिक व मानसिक कोंडी निर्माण झाली आहे. चार महिने आम्ही पगार नसल्याचे कारणामुळे कोणत्याही प्रकारचा काम बंद अथवा दिरंगाई केली नाही. या उलट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मौखिक आदेशाचे पालन करत कार्यक्षेत्रात क्षयरोग नियंत्रणाचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले.सहसंचालकांनी दिलेल्या पत्रानुसार आॅक्टोबरमध्ये तरी पगार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला एक महिन उलटूनही पगार अजून झाला नाही. वास्तविक सर्व कर्मचारी कंत्राटी असून, क्षयरोगासारख्या अतिभयंकर आजाराच्या रुग्णांसोबत काम करतो. सर्व कर्मचाऱ्यांची कौटुंबिक स्थिती ढासळत चालली आहे. चार महिने न झालेल्या पगारामुळे कोणत्याही प्रकारचा सण समारंभ आम्हास करता आला नाही. याऊलट आमचा दैनंदिन गरजा जसे की रेशनिंग, गॅस, पेट्रोल, मुलांची शैक्षणिक फी, नातेवाइकांचे आजारपण पार पाडू शकत नसून आम्हाला कौटुंबिक बाबींची पूर्तता करण्यास आम्ही असमर्थ आहोत. तरी थकित पगार लवकरात लवकर करावा, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ३२ जणांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)