शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

३६६ पोलीस कायद्याच्या कचाट्यात

By admin | Updated: December 11, 2014 23:48 IST

तक्रारींचा पाढा : खाकीविरोधातील फिर्यादींमध्ये सातारा महाराष्ट्रात पाचवा--सीआयडी रिपोर्ट

मोहन मस्कर-पाटील -  सातारा  महाराष्ट्रात पोलिसांच्या विरोधातील तक्रारी वेगाने वाढत असतानाच त्याला सातारा जिल्हादेखील अपवाद ठरलेला नाही. महाराष्ट्रात पोलिसांविरोधात दाखल झालेल्या ७२८0 पैकी ३६६ तक्रारी या एकट्या सातारा जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे लक्षात घेता पोलिसांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात सातारा पाचव्या क्रमांकावर आहे.‘राज्य गुन्हे अन्वेषण विभाग’ तथा ‘सीआयडी’चा २0१३ चा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला असून त्यामध्ये पोलिसांविरोधात दाखल झालेल्या अत्याचाराचे एक स्वतंत्र सात पानी प्रकरण आहे. त्यामध्ये सर्व गुन्ह्यांचा तपशील देण्यात आला आहे.महाराष्ट्रात २0१२ मध्ये पोलिसांच्या विरोधात ६९२५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, २0१३ चा विचार करता यामध्ये ५.१३ टक्के वाढ झाली आहे. २0१३ मध्ये महाराष्ट्रात ७२८0 तक्रारी पोलिसांविरोधात दाखल आहेत. यापैकी सातारा जिल्ह्याचा पाचवा क्रमांक असून येथील तक्रारी ३६६ इतक्या आहेत. सर्वाधिक १२0८ तक्रारी मुंबई शहरात दाखल आहेत. त्या खालोखाल ठाणे ग्रामीण ७७५, सोलापूर ग्रामीण ५४५ आणि पुणे शहर ४८५ आणि नंतर सातारा असा क्रमांक लागतो. सातारा जिल्ह्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. एका तक्रारीवरील सुनावणी पूर्ण होत आली आहे. एका प्रकरणात किरकोळ शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी सातारा पोलीस मुख्यालयात एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार झाली होती. यानंतर बरेच वादंग माजले होते. पोलीस अधीक्षक प्रसन्ना नेहमीच अनेक राजकीय संघटनांच्या रडारवर राहिले. परिणामी विविध आंदोलनांचा केंद्रबिंंदू जिल्हाधिकारी कार्यालय न होता तो पोलीस मुख्यालय बनला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सीताराम मोरेंच्या विरोधातही अनेक तक्रारी झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात पोलिसांकडून मिळणारी वागणूक, ठाणे अंमलदाराचे वर्तन या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी, राजकीय संघटना, सामाजिक कार्यकते त्याचबरोबर इतर अशा तक्रारींचा नेहमीच पाढा असतो. यापैकी बहुतांशी तक्रारी लेखी तर काही तक्रारी तोंडी असतात. काही तक्रारी रेकॉर्डवर येतात तर काही तक्रारीत ज्याच्यावर तक्रार झाली आहे अशा कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला समज देऊन त्यावर पडदा टाकला जातो. मात्र, काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारीही झाल्या आहेत. यापैकी काही तक्रारी या जाणीवपूर्वक असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. विविध कारवाईनंतर पोलिसांचा बदला घेण्यासाठी अशाप्रकारचे गुन्हे दाखल होत असल्याचे सांगितले जाते.मानवी हक्कांचे उल्लंघन नाही...सातारा जिल्ह्यात २०१३ मध्ये पोलिसांच्या विरोधात जेवढ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्यापैकी एकही तक्रार मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे, अशा आशयाची नसल्याचे सीआयडीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. काहीदा पोलिसांकडून त्रास देत असल्याच्या त्याचबरोबर जाणीवपूर्वक मारहाण, एखाद्या राजकीय दबावाखाली झालेली कारवाई अशा कितीतरी तक्रारी सातारा जिल्ह्यात पोलिसांविरोधात झाल्या आहेत. यामुळे मात्र, सातारच्या पोलिसांविषयी चर्चा रंगायला लागल्या आहेत.पोलिसांच्या विरोधात दाखल तक्रारीजिल्हा / विभागअत्याचारसोलापूर ग्रामीण ५४५सातारा३३६सांगली१६६पुणे ग्रामीण१३४कोल्हापूर१७एकुण१,२२८लाचखोरीतही पोलीस नंबर वनसातारा जिल्ह्यात पोलीस दलातही लाचखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आता लाच घेण्यामध्ये तलाठ्यांनाही मागे टाकले आहे. २0११ ते २0१४ ची आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यात २0 पोलीस लाच घेताना जाळ्यात अडकले आहेत. यामध्ये दोन सहायक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षक तर उर्वरितांमध्ये हवालदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच काळात लाच घेताना पकडलेले तलाठी १७ आहेत.