शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात एप्रिल महिन्यात ३५४२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

वाई : तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध ...

वाई : तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होताना दिसत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सामान्य माणसाला आर्थिक अडचणींमुळे उपचार करणे कठीण झाले आहे. १ एप्रिलनंतर राज्यासह देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट असून परिस्थिती हाताबाहेर जाते काय अशी परिस्थिती आहे.

वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत आहे. राज्यात काही जिल्ह्यांत कोरोनाचा वाढता संसर्ग तसेच विषाणूचा नवीन आलेला ट्रेंड यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

वाई तालुक्यात एप्रिलमध्ये ३५४२ रुग्ण सापडले असून, अलीकडच्या काही दिवसांत शंभर ते दोनशेच्या घरात येत आहे. मार्च महिन्यात ४३८ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरणाचा पाहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अभियान चालू केले आहे. वाई शहरातून विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. वाई ग्रामीण व शहरातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून किसनवीर महाविद्यालयाच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये विलगीकरण कक्ष ऑक्सिजन बेडची वाढती गरज पाहता ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार असून, पाच व्हेंटिलेटर बेडची सोय केली जाणार आहे तसेच मॅप्रो हॉस्पिटल मध्ये ३० ऑक्सिजन बेड ६ व्हेंटिलेटर बेड तयार करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली आहे तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्य अनिल सावंत, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, तालुका आरोग्य अधिकारी संदीप यादव यांनी केले आहे.