शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

दोन एसटींच्या धडकेत ३४ प्रवासी जखमी

By admin | Updated: July 3, 2016 00:11 IST

महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील घटना

पाचगणी : पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील अवकाळी गावाजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. जखमींना पाचगणीच्या शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना साताऱ्याला हलविले आहे. पोलिस व अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी की, श्रीवर्धन आगाराची श्रीवर्धन-मिरज (एमएच २० बीएल २४७४) ही बस शनिवारी दुपारी महाबळेश्वरहून पाचगणीकडे येत होती. त्याचवेळी महाबळेश्वर आगाराची पुणे-महाबळेश्वर (एमएच ०६ एस ८३७४) ही बस पाचगणीहून महाबळेश्वरकडे जात होती. दोन्ही गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्यांच्या काचा फुटल्या, तसेच इंजिनचे मोठे नुकसान झाले. दोन्ही बसमधील ३४ प्रवासी जखमी झाले. जखमींवर पाचगणीतील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून साताऱ्याला हलविले. अपघातातील जखमींची नावे अशी : नौबनिया भोग (वय ३९), पुरभाषा घोष (२८), इसिता घोष (२२), शहाबुद्दीन शेख (४०), यश उत्तम बढे (३०), भाग्यश्री यश बढे (२६), अंजली प्रशांत चावकर (५०), भक्ती सौरभ मिश्रा (३१), सिद्धी सौरभ मिश्रा (७), सायली सतीश पाटील (२३), पुष्पा पाटील (४६), ओडीमीन घोष (२१, सर्व रा. पुणे), सुभाष कोंडिबा कदम (४२ रा. विवर, महाबळेश्वर), फारुख पटेल (४१, रा. खानापूर), रेश्मा संतोष बावळेकर (३२), निरंजन संतोष बावळेकर (११, रा. महाबळेश्वर), नितीन जनार्दन ताटे (३४, कांदिवली), गणेश नामदेव सावंत (३०, रा. कापडे), समीर आत्तार (३०, रा. विजवाडी), प्रकाश सुखदेव दांगडे (३८, रा. शिरगाव), सागर अंकुश कासुर्डे (३०, वरोशी), विवेक विलास शिंदे (२४, माणगाव), दत्तात्रय रामचंद्र निरुटे (३४, खंडाळा), विवेक वसंत पिंगळे (५०), मैत्रेय विवेक पिंगळे (४९, दोघे रा. माचुतर), राजन देशमुख (३२, रा. वाई), राजेंद्र विनायक ठोंबरे (५२, रा. बारामती), अल्मास जवरे (२३), यमन जवरे (८), आदिनाथ जवरे (२५), शहीसा जवरे (३४, चौघे रा. बुरुड), कमलाकर गोविंद तांदळे (५०, रा. श्रीवर्धन), उमेश दत्तात्रय शिंगरे (२९, रा. साळवणे), अमोल शंकर वाघ (२८ चिंचली कोरेगाव). पाचगणी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) अपघातांची मालिका सुरूच... ४या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, गेल्या आठवड्यात याच ठिकाणी एक अपघात झाला होता. ४पाचगणी परिसरात सध्या पाऊस आणि धुके असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही.