शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

३२ फूट खोलीचा तलाव अवघ्या पाच फुटांवर!

By admin | Updated: August 12, 2016 00:06 IST

शासनाचे दुर्लक्ष : ब्रिटिशकालीन तलाव, पाटाचीही दुरवस्था

मायणी : येथील ब्रिटिशकालीन तलाव १२५ वर्षांकडे वाटचाल करत असला तरी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. प्रारंभी ३२ फूट खोली असणारा तलाव सध्या केवळ ५ फुटांवर आला असून, या तलावातून शेती पाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाटाचीही दुरवस्था झाली आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागातील डोंगर उतारावर मायणी येथे ब्रिटिशांनी तलावाची बांधणी केली. या तलावाच्या कामाला कधी सुरुवात झाली हे निश्चित सांगता येत नाही; पण १८९६ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १८९६ मध्ये हे काम सुरू होते याची नोंद चांगदेव खैरमोडे यांच्या चरित्र ग्रंथात आहे. याकाळी ५०० एकरांत ३२ फूट खोलीचे या तलावाचे बांधकाम १९०० साली पूर्ण झाले. त्यावेळी जुना सातारा जिल्हा अस्तित्वात होता. त्यावेळी मायणी, माहुली, चिखळहोळ आदी भागांतील क्षेत्र ओलिताखाली येत होते. यासाठी तलावाच्या सांडव्याच्या बाजूस असलेल्या दगडी भिंतीच्या प्रारंभीच लोखंडी दरवाजा बसविण्यात आला होता. त्या दरवाजातून पाटाचे पाणी शेतीला दिले जात होते. त्यामुळे या पाटाच्या दोन्ही बाजूस सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंत काळीभोर सुपीक जमीन आहे.जर या तलावातील गाळ काढला तर मायणी व परिसरातील शेत जमिनीचा कायमचा पाणी प्रश्न मिटेल तसेच याच तलावावरील भागातून (पूर्व-दक्षिण) टेंभू योजनेचा कॅनॉल सोलापूर-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून जात आहे.या पाटातून नैसर्गिंक उतारानेही पाणी तलावात येऊ शकत असल्याचे त्याच्या रचनेवरून वाटते.जर तलावात पाणी आले तर सातारा जिल्ह्यातील मायणी, चितळी, कलेढोण आदी भागांसह सांगली जिल्ह्यातील माहुली, चिखळहोळ आदी भागांचा शेतीपाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. (वार्ताहर)