सातारा : इनरव्हिल क्लब ही महिलांची जागतिक संघटना आहे. या संघटनामार्फत समाजातील गरजू महिला व मुली यांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. इनरव्हिल क्लब आॅफ सातारा कॅम्पतर्फे कर्करोगविरोधी जागृतीकरिता महिलांचे उद्बोधन करण्यासाठी रविवार, दि. ३० नोव्हेंबर १४ रोजी सातारा जिल्हा परिषद मैदान येथून सातारा ते महाबळेश्वर (हॉटेल साज) महिलांच्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार रॅलीमध्ये पनवेल, पुणे, कऱ्हाड, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ३०० महिला सहभागी झाल्या आहेत. ‘कॅन्सरचे प्रमाण देशात खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. त्याला बरेच घटक जबाबदार आहेत. प्रदूषित जमीन, अन्न, पाणी, रासायनिक खते, कीटकनाशके हे घटक जबाबदार आहेत,’ असे डॉ. जवाहर शहा यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)गेली अनेक वर्षे कॅन्सरविषयी उपक्रम इनरव्हिल क्लबमध्ये घेतले जातात. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मॅमोग्रॉफी व पॅप्समिअर तपासणी करून घेताना चार महिलांना कर्करोग झाल्याचे प्राथमिक अवस्थेत निदान झाले. वेळीच निदान झाल्याने पुढील स्टेजमधील किमोथेरपी व रेडिएशेन अशा वेदनादायी उपचारापासून त्या वाचू शकल्या.- गीता मामणिया, जिल्हाध्यक्षा
तीनशे महिलांची उद्या कार रॅली
By admin | Updated: November 28, 2014 23:51 IST