शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन महिन्यांत २८ आत्महत्या; प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा ...

सातारा : गत दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये ६९ जणांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. माणसाच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करताना होणारी दमछाक, अपेक्षापूर्ती न झाल्याने माणसांमध्ये नैराश्याची भावना वाढत जाऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

जिल्ह्यात २०१९ मध्ये सुमारे २६८ जणांनी आत्महत्या केल्या, तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्र बंद पडल्याने अनेक उद्योग बंद पडले. नोकऱ्या गेल्या. आर्थिक नुकसान झाले. जवळचे कोरोनाने दगावल्याने माणसे व्यसनाधीन झाली. परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वतःला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मक विचार मनात येऊ लागले. त्यातून अनेकांनी आत्महत्या केल्या.

जिल्ह्यात २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण थोडेफार घटले. या वर्षात माणसाला कोरोनाने घेरले. त्यातून वर्षभरात सुमारे १७३ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या प्रारंभीच्या कालावधीत अनेक जण स्वतःला सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले; पण गतवर्षीचा अनुभव पाहता आता हे संकट फक्त आपल्या एकट्यावरच नाही. सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे गत दोन वर्षांतील आत्महत्येचे सरासरी प्रमाण गत तीन महिन्यांत कोरोनाच्या संकटामुळे आत्महत्येचे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी ते मार्च २०२१ अखेरपर्यंत २८ जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे.

कोट:

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही, तर सारेच अडचणीत आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात सध्या निर्माण होत आहे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून लोक मार्ग काढत आहेत. या कोरोनाच्या काळामध्ये मानसोपचार तज्ज्ञ अथवा समुपदेशकाकडून उपचार घेणे, कौटुंबिक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकते.

डॉ. एच. डी. पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सातारा

चौकट :

कोरोना संकटात तेरा आत्महत्या

जिल्ह्यात कोरोनाचे संकट महाभयंकर ओढावले आहे. सारेजण संकटात सापडले आहेत; पण गत वर्षभरापासून आर्थिक नुकसानीत पुन्हा उभे राहण्याची उमेद संपल्याच्या नैराश्यातून जिल्ह्यात ११ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय इतरही आत्महत्या झाल्या; पण त्यासाठी ठोस कारण पोलिसांच्या दप्तरी नोंद नाही.

चौकट :

२०१९ ला झालेल्या आत्महत्या २६८

२०२०- १७३

२०२१ जानेवारी ते मार्च - २८