शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

२८ बोटी पर्यटकांसाठी सज्ज

By admin | Updated: April 15, 2016 23:28 IST

महापुरुष पर्यटन सहकारी सेवा संस्थेला मान्यता : तारकर्लीत समुद्री सफारीची परवानगी

मालवण : गेले अनेक दिवस सिंधुदुर्गात पर्यटकांसाठी समुद्र सफर करण्यासाठी शासन स्तरावर अधिकृत परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, अनेक परवान्यांमुळे अधिकृत परवान्यासाठी अडचणी येत होत्या. अखेर या सर्व अडचणींवर मात करीत तारकर्ली येथील महापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्थेने आपल्या २८ बोटींसाठी अधिकृतपणे समुद्र सफारीचे परवाने उपलब्ध केले आहेत. तारकर्ली बंदर जेटी येथून पर्यटकांना समुद्रात पर्यटन सफारी करण्याचा अधिकृत परवाना जिल्हाधिकारी यांनी तारकर्ली येथील महापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित यांना दिला आहे. या संस्थेच्या २८ बोटी अधिकृतपणे समुद्र सफारी करण्यास सज्ज झाल्या आहेत. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नुकतेच परवाने संस्थेला दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी सूर्योदयांपासून सूर्यास्तापर्यंत परवानाधारकांना पर्यटकांसाठी समुद्र सफारी करण्यास परवानगी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत रात्री पर्यटकांसाठी समुद्र सफारीस नेण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बोट चालविण्यासाठी नौकायनन शास्त्रात पारंगत असलेल्या हुशार, निर्व्यसनी, सद्वर्तनी, व्यक्तींची नेमणूक करणे परवानाधारकांवर बंधनकारक आहे. प्रशिक्षित नावाड्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस बोट, लॉँच, होडी चालविता येणार नाही. प्रत्येक बोटीवर जीव वाचविण्यासाठी लाईफ जॅकेटसारखी साधने पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावीत. जलक्रीडा उपक्रमातील बोटीतून फक्त पर्यटक किंवा प्रवासी प्रवास करणार आहेत. यामध्ये पशु, पक्षी, प्राणी व इतर माल नेता येणार नाही, अशा अनेक अटी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून घालण्यात आलेल्या आहेत. संस्थेला अधिकृत परवानगीसाठी संस्था चेअरमन रामचंद्र कुबल, व्हॉईस चेअरमन डॉ. जितेंद्र केरकर, संचालक संजय केळुसकर, मंगेश टिकम, स्नेहा केणकर, स्नेहल केळुसकर, सुहास मयेकर, भिवाजी कोळंबकर, गंगाराम खराडे, नंदू टिकम यांनी प्रशासकीय पातळीवर याचा पाठपुरावा केला. यासाठी जिल्हाधिकारी सावळकर, करमणूक शाखा अधिकारी बागायतकर, तहसीलदार वनिता पाटील यांनी सहकार्य केल्याने तारकर्ली संस्थेतर्फे त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)प्रायोगिक तत्त्वावर परवानामहापुरुष पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित, तारकर्ली यांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंदर जेटी ते देवबाग संगम (डॉल्फीन पॉइंट) व परत तारकर्ली बंदरजेटी ते देवबाग संगम व परत तारकर्ली बंदर जेटी याठिकाणी पर्यटकांसाठी समुद्र सफारी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ३१ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रात पर्यटन सफारीसाठी अधिकृत परवानगी दिलेली आहे.