सातारा : मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची स्थापना १५ ऑगस्ट १९९४ रोजी कै. महादेव चव्हाण यांनी केली. संस्था स्थापण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे डोनेशन न घेता कमी फीमध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून एक भारताचा जबाबदार नागरिक बनविणे हा आहे.
अनेक विद्यार्थ्यांना कमी गुणामुळे, भरमसाट फीमुळे व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे इच्छा असूनही शहरामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण घेणे परवडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने अनेक कोर्सेस सुरू केलेले आहेत. सुरुवातीला संस्थेने आर्किटेक्चर, ड्राफ्ट्समन व इंटिरिअर डिझायनिंग हे दोन अभ्यासक्रम सुरू केले. नंतर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझायनिंग व हॉटेल मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार डिप्लोमा व डिगी कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत. आज संस्थेला २७ वर्षे पूर्ण करण्याचे श्रेय सर्व विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना देण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले तसेच विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याचा लाभ सर्व आजी, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य अनिल चव्हाण व व्यवस्थापिका अमृता चव्हाण यांनी केले आहे. (वा.प्र.)
फोटो आहे...