शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

२३ ठरावांना २३ मिनिटांत मंजुरी

By admin | Updated: January 23, 2016 00:52 IST

फलटण पालिका सभा : विविध ठराव; फलक लावणाऱ्यांवर फौजदारी

फलटण : फलटण नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस महाराजा मालोजीराव नाईक-निंबाळकर भवन असे नाव देण्यात यावे, या ठरावासह एकूण २३ ठरावांना २३ मिनिटांत एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या फलकवर बंदी घालण्याचा व फलक लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. फलटण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संजीवराजे नाईक-निंबाळकर सभागृहात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सारिका जाधव होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक सोमाशेठ जाधव, नितीन भोसले, अनिल जाधव, नंदकुमार भोईटे, जालिंदर जाधव, पै. हेमंत निंबाळकर, सुरेश पवार, अनुप शहा, सुरेश पवार, अ‍ॅड. मधुबाला भोसले, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, संगीता शिंदे, मुख्याधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.सभेत फलक, होर्डिंग्ज बोर्ड, फलक बंदीचा अंत्यत महत्त्वाचा ठराव संमत झाला. शनिवारपासून शहरात फलक, होर्डिंग्ज बोर्ड, फलक दिसणार नाहीत. दिसले तर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तसेच रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी सुचविलेल्या नगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीस महाराजा मालोजीराव नाईक-निंबाळकर भवन असे नाव आणि नगर परिषद मंजूर विकास आराखडा आ.क्र. ८७ येथील शॉपिंग सेंटरला राजधानी टॉवर्स असे नाव देण्याचा ठराव संमत झाला. (प्रतिनिधी) कामांनाही मंजुरी...सुधारित जलशुद्धीकरण केंद्र येथे वॉचमन केबीन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा वितरण नलिकेवरील नादुरुस्त व्हॉल्व बदलण्याच्या कामाच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून पंढरपूरकडे जाणाऱ्या निरा-उजव्या कालव्यापर्यंतच्या रस्त्याची उत्तरेकडील साईडपट्टी खडीकरण, डांबरीकरण करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.