शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत सांगलीसाठी २१ टीएमसी पाणी

By admin | Updated: February 18, 2015 23:47 IST

कोयनेत समाधानकारक पाणीसाठा : १८७४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; सध्या ८० टक्के पाणीसाठा शिल्लक

अरुण पवार - पाटण -जलविद्युत निर्मितीचा अखंड स्त्रोत असणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर एक जुलैपासून आजअखेरच्या नऊ महिन्यांमध्ये एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या शिवसागर जलाशयात ७७. ३३ टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील ३९.३२ टीएमसी पाणीवापर वीजनिर्मितीसाठी तर सांगलीकडील पाण्याची गरज भागविण्यासाठी २१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या की पाणीटंचाईची भीती आणि विजेच्या लोडशेडिंगचे भूत मानगुटीवर बसते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांच्या नजरा आपोपच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाकडे जातात. म्हणूनच कोयना धरणाची काय स्थिती आहे, हे वरचेवर जाणून घ्यावे लागते. कोयना धरण १०५. २५ टीएमसी पाणीक्षमता असणारे आहे. दिवसाला १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात आहेत. त्यासठी पोफळी येथे टप्पा क्रमांक १ आणि २ अलोरे व नवजा येथील चौथा टप्पामधून वीजनिर्मितीसाठी विद्युत जनित्रे पाण्यावर फिरविली जातात. दि. १ जून ते ३१ मे असे कोयना धरणातील पाण्याचे तांत्रिक नियोजन असते. त्यानुसार आजअखेर पोफळी १ व २ टप्पामधून ७५०. ४६ तसेच अलोरे येथून ३६५. १०, टप्पा क्र. ४ मधून ७०२. ९२ आण पायथा वीजगृहातून ५५. ८१ अशी एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती आजअखेर करण्यात आली आहे. त्यासाठी ३९. ३२ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षी याचदिवशी कोयना धरणात ५९.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या तो ७७.३३ टीएमसी इतका आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सांगलीकडे पाणी सोडले जाते. तर अलोरे व पोफळी वीजगृहातील पाणी कोळकेवाडी धरणात साठवून चिपळूणकडे सोडले जाते. गतवर्षी कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठीचा पाणीवापर ८० टीएमसी पर्यंत गेल्यामुळे एप्रिल-मेमध्ये धरणात न भूतो न भविष्याती असा खडखडाट झाला होता. त्यामुळे यंदा तसे होणार नाही. याची दक्षता घेण्यात आल्याचे शिल्लक पाणीसाठा ७७. ३३ टीएमसी वरून लक्षात येते. पाण्याचा पूर्णक्षमतेने वापर ...मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचा काळ कोयना धरणासाठी काळ बनूनच येतो. कारण सांगलीकडे पाणी मागणी वाढते तर वीजनिर्मितीची तहान देखील अधिक तीव्र होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याचा वापर झपाट्याने होतो. येत्या १ जूनपर्यंत कोयना धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर व्हावाच, अशी अपेक्षा असते. कारण त्यानंतर पावसाळा सुरू होतो. तेव्हा त्याअगोदर पूर्णक्षमतेने पाणीवापर झालाच पाहिजे.सध्या कोयना धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. सध्या असणारा ७७. ३३ टीएमसी पाणीसाठा हा आगामी काळासाठी करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेती सिंचनासाठी शाश्वत ठरणारा आहे.- व्ही. एस. तोंडले, शाखा अभियंता