शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजय पाटीलसह २१ एजंट अटकेत

By admin | Updated: February 5, 2017 01:04 IST

साकोली कॉर्नर येथे मटकाबुकीवर छापा : पाच लाखांसह ३१ मोबाईल; दुचाकी जप्त

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत रंकाळा बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या केदार प्लाझा इमारतीमध्ये मटका बुकीवर शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून मटकाकिंग विजय लहू पाटील, अजित बागलसह २१ एजंटांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांसह दुचाकी गाड्या, मटक्याच्या चिठ्ठ्यांची दहा पोती जप्त केली. संशयित विजय पाटील, अजित बागल यांच्यावर यापूर्वी पोलिस दप्तरी मटकाप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरीच्या काळात मटका कारवाया तुरळक प्रमाणात होत्या; पण, शनिवारच्या या मोठ्या कारवाईने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले.साकोली कॉर्नर येथे केदार प्लाझा इमारत आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये संशयित विजय पाटील, अजित बागल यांना एजंट लोक रोज या ठिकाणी मटक्याच्या कलेक्शनचे पैसे आणून देतात. शनिवारी हे सर्वजण मटक्याचे पैसे जमा करण्यासाठी आले होते. तसेच या फ्लॅटमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्याही होत्या. रात्री अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचे पथक व जुना राजवाडा पोलिसांनी विजय पाटीलच्या या मटकाबुकीवर छापा टाकला. यावेळी फ्लॅटमध्ये विजय पाटीलसह सर्व एजंट पैसे मोजत बसले होते. यामध्ये नव्या पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांसह शंभर, पन्नास अशा स्वरूपाच्या चलनी नोटा होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्यानंतर पैसे मोजण्यास सुरुवात केली. सुमारे दोन ते अडीच तास पोलिस पैसे मोजत होते. रात्री उशिरापर्यंत कारवाईचे (पान १० वर)माजी नगरसेवक मूळ बुकीमालक ?विजय पाटील आणि अजित बागल हे मटकाकिंग जरी या कारवाईत अटक झाले असले तरीही, या बुकीच्या पडद्यामागे राहून हालचाली करणारा मूळचा मालक हा शिवाजी पेठेतील एक माजी नगरसेवक असल्याची चर्चा या परिसरात होती. तो मालक नेहमीच पडद्यामागे असून, राजकीय वलयाखाली वावरत आहे. यापूर्वी त्याच्यावर क्वचितच मटकाप्रकरणी कारवाई झाली आहे. त्यामुळे या मूळ मालकाच्या मागावर रात्री उशिरा पोलिसांचे पथक गेल्याचे समजते.दहा पोती चिठ्ठ्या सापडल्यासंपूर्ण जिल्ह्यातील मटका एजंट एकावेळी पैसे कलेक्शनसाठी एकत्र जमा झाले होते. या कारवाईत सुमारे दहा पोती मटक्यांच्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी प्राथमिक कारवाईत सुमारे ५ लाख रुपये जप्त केल्याचे सांगितले असले तरी रात्री उशिरापर्यंत या पैशाची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ही जप्त केलेली रक्कम किमान १५ लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.