सातारा : ‘निर्मिती कमी अन् मागणी मोठी’ राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन सुरू झाले आहे. त्याचा फटका वीजनिर्मितीचे प्रमुख केंद्र असणार्या सातारा जिल्ह्याला बसू लागला आहे. महाराष्ट्र उजळून टाकणारे कोयना धरण सातारा जिल्ह्यात असतानाच सातारकरांना मात्र गेले दोन दिवस २00 मेगावॅट विजेचा तुटवडा भासू लागला आहे. दरम्यान, सद्या सुरू असलेले भारनियमन हे तात्पुरते असल्याचा दावा ‘महावितरण’च्या सातारा कार्यालयाने केला आहे. उन्हाचा तडाखा कमी झाला तरच भारनियमन कमी होईल, असे चित्र सध्या तरी आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा बसू लागल्यामुळे साहजिकच वीजेची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे विद्युत वाहिन्यांवर त्याचा ताण येत असून कोणत्याही अनेक भागातील फ्युजा जळत आहेत. त्याचबरोबर अनेकदा डीपीसेंटरही नादुरुस्त होत आहे. सातारा शहरात गेल्या काही दिवसांत असे प्रकार अनेक घडले आहेत. महाराष्ट्रात भारनियमनाचे ‘ए ते जी’ असे सात ग्रुप असून ‘एफ ते सी’ या तीन टप्प्यांत भारनियमन नेहमीच होत असते. वेळेवर वसुली आणि बिल भरणा असल्यामुळे सातारा जिल्ह्यात मात्र, ‘एफ ते सी’ हे तीन ग्रुप नाहीत. परिणामी भारनियमनाचा प्रश्नच येत नव्हता. मात्र, वाढता उष्मा परिणमी विजेचा वाढलेला वापर यामुळे फक्त साताराच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा फटका बसू लागला आहे. सातार्यात आता ‘सी ते डी’ या दोन गटात भारनियमन करावे लागणार आहे. सातारा जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्यामुळे बहुतांशी धरणातून वीजनिर्मितीही होते. कोयना धरणातून दोन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होते. रात्रीच्यावेळी महाराष्ट्राचा अंधार दूर करण्यात कोयना धरणाने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यातच आहे. त्यातच सातारा जिल्ह्याची मागणी ७00 ते ७५0 मेगावॅट आहे. मात्र, आता प्रत्यक्षात सातारा जिल्ह्याला ५00 ते ५५0 मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्यात ‘ए ते डी’च्या १६८ वीजवाहिन्या आहेत. यापैकी ‘सी आणि डी’मध्ये कृषी पंप आहेत. कृषी पंपासाठी मात्र, ‘महावितरण’चे धोरण निश्चित असून त्याची कार्यवाही योग्य पध्दतीने सुरू आहे. येथे आठवड्यातील तीन दिवस रात्री दहा तास आणि दिवसा आठ तास अखंडित वीजपुरवठा केला जातो. मात्र, कृषी पंपानाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असून भारनियमनात वाढ होणार आहे. परिणामी याचा फटका कृषी क्षेत्राला बसणार असून उत्पादनात घटणार आहे. (प्रतिनिधी) नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग
वीजनिर्मितीच्या सातार्यात २00 मेगावॅटचा तुटवडा
By admin | Updated: May 26, 2014 01:15 IST