शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

कर्मचारी दोनशे अन् गाड्या चारशे !

By admin | Updated: April 1, 2015 00:10 IST

एसटी कामगारांनाच मिळेना जागा : डोकेदुखी थांबविण्यासाठी सातारा आगाराने तयार केले ‘पार्किंग स्टिकर’; जिल्ह्यातील अभिनव उपक्रम

सातारा : कोणतेही गाव असो वा शहर एसटी बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘आवो जावो घर तुम्हारा...’ अशी स्थिती असते. मात्र सातारा आगाराला वेगळाच अनुभव येत आहे. या ठिकाणी दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, इतर प्रवासीच गाड्या लावत असल्याने आगारात दररोज सरासरी चारशे वाहने उभी केली जात होती. यावर उपाय काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्टिकर तयार केले आहे.पुणे-कोल्हापूर मार्गावर सातारा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे दररोज येऊन-जाऊन करणारे असंख्य सातारकर बसस्थानकात गाड्या उभ्या करुन जात असतात. मात्र, बसस्थानकात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. इतरत्र लावलीच तर सातारा पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते.कारवाई टाळण्यासाठी अनेक मंडळी क्लृप्त्या लढविल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात किंवा विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची मैत्री करतात. त्यांना चहा-पाणी देऊन ‘मी आज गावाला चाललोय, आत गाडी लावतो. जरा लक्ष असू द्या,’ अशी गळ घातली जाते. एकदा गाडी लावली की पुढे वारंवार गाड्या लावल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांपेक्षा प्रवाशांच्या गाड्या जास्त झाल्या आहेत, अशी अवस्था झाली होती.सातारा आगारात २६ जानेवारीला आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आगारात गाड्यांच्या ताफा लागलेला होता. कार्यक्रमासाठी मोकळी जागा करायची होती. मात्र त्यांचे मालकच सापडले नाहीत. शेवटी कर्मचाऱ्यांनी उचलून दुसरीकडे ठेवले. त्यानंतर त्या गाड्या चार-पाच दिवस बेवारस स्थितीतच पडूनच होत्या. यावर सातारा आगाराने पर्याय काढला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे बोधचिन्ह असलेले स्टिकर तयार केले असून कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना लावण्यास दिले आहेत. हे स्टिकर असले तरच आत प्रवेश देण्याबाबत सुरक्षा रक्षकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे आगारात गेल्यानंतर स्टिकरवाल्याच गाड्या पहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)अप्रिय घटनांना आळा बसणारअनेक लोक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाड्या लावतात. त्यामध्ये काही गाड्या महिनोंमहिने लावलेल्या असतात. त्यामुळे चोरीच्या गाड्या कोणत्या आहेत, तेही कळत नाही. काही लोक बेवारस गाड्यांवर लक्ष ठेवून त्यांना समाजविघातक कारवायांमध्ये वापर केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सातारा आगाराने राबविलेला प्रयोग अनोखा असून कऱ्हाड आगारही हा प्रयोग करणार आहे.कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ‘प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ’ असे ब्रिदवाक्य घेऊन एसटी महामंडळ अनेक दशकांपासून सेवा बजावत आहे. एसटी महामंडळाचेच बोधचिन्ह या स्टिकरसाठी वापरले आहे. मात्र त्यावर ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ ऐवजी ‘कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. कर्मचारीही अभिमानाने स्टिकर लावत आहेत.