शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीपूर्वीच ग्राहकाच्या हातात १९ हजारांचे बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते ...

कराड : वीज कनेक्शन जोडलेले नाही,मुळात मोटारच बसवलेली नाही. तरीही शेतकऱ्याच्या हातात तब्बल १९ हजारांचे वीजबिल पडलेले आहे. ते बिल मुदतीत न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल असेही त्यात नमूद केले आहे. ही काही काल्पनिक कथा नाही तर आणे ( ता. कराड) येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे .

आणे (ता. कराड) येथील आनंदराव तुकाराम देसाई यांनी गतवर्षी वांग नदीतून शेतीसाठी पाणी उचलण्यासाठी रीतसर परवाना घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी वीज कंपनीकडे जोडणीसाठी अर्ज केलेला आहे. जोडणी त्वरित मिळावी म्हणून आजवर अनेक हेलपाटेही त्यांनी कार्यालयात घातले आहेत; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पण तरीही त्यांच्या हातात वीज बिल मिळाल्याने त्याला धक्काच बसला आहे.

हे बिल हातात पडल्यावर संबंधित शेतकरी अचंबित झाला असून त्याने कोळेवाडी (ता. कराड) येथील कंपनीच्या कार्यालयात सदरचे बिल दाखवले.तेथील कर्मचाऱ्यांना हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी वीज बिल चुकले आहे. ते बदलून दुरुस्त करून आणा. अशी जुजबी उत्तरे दिली आहेत.पण चूक का व कशामुळे झाली याबाबत शब्द काढलेला नाही. परिणामी वयोवृद्ध असणाऱ्या देसाई यांची चूक नसताना हाल सुरू आहेत.

वास्तविक वीज जोडणी केल्यानंतर मोटार बसवल्यानंतर त्याचा टेस्टिंग रिपोर्ट सादर केला जातो. त्यानंतर वापर सुरू झाल्यावर त्याचे रीडिंग तपासले जाते. त्यानंतर वीज बिल ग्राहकाला दिले जाते. मग आणे येथील संबंधित शेतकऱ्याला वीज जोडणी न देताच त्याचा टेस्टिंग रिपोर्ट कसा केला गेला? वीज वापरच नसताना त्याचे रीडिंग कोणी व कसे घेतले? हा सारा संशोधनाचा भाग आहे.

चौकट

ग्राहकांच्या मनात शंका

वीज कनेक्शन न जोडता वापराचे रीडिंग न घेताच जर वीज वितरण कंपनी ग्राहकाला वीज बिल देत असेल तर ही बाब मोठी गंभीर आहे. शिवाय आपल्या वापरातील वीज मीटरमधील रीडिंग तरी व्यवस्थित घेतली जातात का?त्यात काही झोल आहे का? अशा प्रकारच्या शंका आता ग्राहकांच्या मनात निर्माण होऊ लागल्या आहेत.

(कोट)

मुळातच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांचे पंचनामे झाले असले तरी नुकसानभरपाई मिळेल का? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यातच वीज वितरण कंपनीने अशाप्रकारे अनागोंदी कारभार करून वीजजोडणी न करता आज जर वीज बिले द्यायला सुरुवात केली. तर ही बाब गंभीर आहे. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने त्याचा समाचार घेऊ.

-सचिन नलावडे

रयत क्रांती शेतकरी संघटना