शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१८९ किलोमीटरचा परिसर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:13 IST

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस ...

सातारा : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वेळे, ता. वाई ते पाचवड नाका (कºहाड) हायवेच्या दुतर्फा सर्व्हिस रोडवर एकूण १८९ किलोमीटरच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. तसेच दोन टोलनाके व ४४ उड्डाणपुलांची देखील स्वच्छता करण्यात आली.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा (ता. अलिबाग) येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने राज्यपाल नियुक्त स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी पुण्याहून-कोल्हापूरकडे जाणाऱ्या आशियाई महामार्गावर स्वच्छता करण्यात आली.स्वच्छता अभियानांतर्गत तब्बल ३ हजार ६१२ सदस्यांनी कचरा गोळा करून त्याची योग्य त्या प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. तसेच गोळा करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी कºहाड नगरपरिषदेच्या सुका कचरा संस्करण केंद्र्रास पाठविण्यात आला.दरम्यान, या महामार्गाावरून वाहतूक करणाºया सरासरी सात ते आठ हजार गाड्यांतील साधारण लाखो प्रवाशांपर्यंत स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास प्रतिष्ठानचे कार्य यशस्वी झाले आहे. यावेळी कित्येक वाहनचालकांनी चालू गाडीतून कचरा अथवा प्लास्टिक बाहेर न टाकण्याचा मानस व्यक्त केला. ही प्रतिष्ठानच्या कार्यास मिळालेली पोचपावतीच आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.गाव, वाड्या, वस्त्या, सरकारी, निमसरकारी कार्यालये, शहरातील मुख्य रस्ते व उपरस्ते, न्यायालय, सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, तलाव नदीकाठचा परिसर, स्मशानभूमी, दफनभूमी आदी ठिकाणी प्रतिष्ठानमार्फत आत्तापर्यंत स्वच्छता अभियाने यशस्वीरीत्या झाली आहेत. मात्र १८९ किलोमीटर आशियाई महामार्गाची दुतर्फा सेवारस्ता स्वच्छता करण्याचा संकल्प जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. यामुळे सर्व स्तरातून प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.दरम्यान, या स्वच्छता अभियानात जिल्हा परिषदेचे सदस्य संग्रामसिंह पलंगे, खेड सरपंच इंदिरा बोराटे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, बासुतली खान, सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग कºहाड अस्मिता पाटील, उंब्रजचे उपसरपंच अजित जाधव, उत्तम कांबळे नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून करण्यात आली होती. तसेच मास्क व हातमोजे प्रतिष्ठानकडून पुरविण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी खराटे, दाताळे, घमेली, खोरे, झाडू, पंजे आदी साहित्य स्वत: आणून स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले.