शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

By admin | Updated: September 16, 2016 23:43 IST

अवजड वाहतूक बंद : सातारा - लोणंद, फलटण, बारामतीची वाहने कोरेगावमार्गे वळविली

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील १७१ वर्षे जुन्या पेशवेकालीन पुलावरील रस्ता तसेच पायाजवळ शुक्रवारी दुपारी भगदाड पडले. संभाव्य धोका ओळखून हा पूल शुक्रवारपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सातारा-लोणंद, फलटण, बारामतीची सर्व वाहने कोरेगाव मार्गे वळविली आहेत.सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम पेशवेकालीन आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटिश सरकारने पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपले असल्याचे सूचित केले आहे. महाड दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व पेशवेकालीन पुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावेळी वडूथ-आरळे येथील पुलावर एक-दोन ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, काटेरी झुडपे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे,’ असे सांगितले होते. साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारी सर्व वाहतूक वडूथ-आरळे येथील या पुलावरून केली जाते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. आरळे बाजूने महिन्यापूर्वी दोन फुटांचा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये चार डंपर मुरूम टाकून तो मुजविला होता. त्यावेळीच ग्रामस्थ पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पुलाला सुरुवात होते तेथे व पायाजवळ मोठे भगदाड पडल्याचे शुक्रवारी दुपारी निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. त्यानुसार ही वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)-------------------उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना सूचनाआरळे पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या पुलाची तत्काळ पाहणी करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी सहकार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा गीतांजली कदम, प्रताप शिंदे उपस्थित होते.\‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे व झुडपे वाढली आहेत. तसेच पुलावरील ड्रेनेज पाईप बुजले असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साठत असते. प्रत्येक वेळी पुलावर होणाऱ्या डांबरीकरणामुळे पुलाचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत पुलावरून अवजड वाहने वाढली असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच व्यक्त केली होती.अठरा किलोमीटरचे अंतर वाढले...वडूथ-आरळे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारे ट्रक, टेम्पो, एसटी बसेस कोरेगाव मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे साधारणत: अठरा कि.मी.चे अंतर वाढले आहे.