शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज ...

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज वैध ठरले असून, सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यासाठी येथील प्रशासनकीय कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. अखेर मुदतीत एकूण १ हजार ८३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीचे एकूण चित्र दुपारी स्पष्ट झाले. तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, महारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, चिखली, पाचुंद, गोटे, वसंतगड, उंडाळे, हरबरवाडी व विरवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर २४६ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये हजारमाची ५, कामथी ७, किरपे ७, येणके ९, ओंड २, खुबी २, संजयनगर ९, शहापूर ८, वाघेश्वर ६, म्हासोली ७, लटकेवाडी ५, गमेवाडी ३, साकुर्डी १, भोळेवाडी ५, साळशिरंबे १, महारुगडेवाडी ७, शेवाळवाडी ४, शेळकेवाडी १, सवादे ६, शेवाळवाडी-उंडाळे २, पाडळी १, घोगाव ४, टाळगाव ९, गोटेवाडी १, भुरभुशी ७, शिवडे ५, भवानवाडी ४, अंबवडे ५, खालकरवाडी २, हरपळवाडी ३, वराडे १, आबईचीवाडी ६, खराडे २, नवीन कवठे १, गोळेश्वर २, खोडजाईवाडी ५, वाठार २, कोळे १, बामणवाडी २, पाचुंद ५, गोटे ११, वसंतगड ९, नांदलापूर १, भरेवाडी ३, काले ४, चौगुलेमळा ५, उंडाळे ९, अक्काईचीवाडी ३, हणबरवाडी ९, भुयाचीवाडी ३, विरवडे ११, वाघेरी १, कोडोली ६, गोवारे येथील १ अशा २४६ उमेदवरांचा समावेश आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांत दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर काही गावांमध्ये तिहेरी निवडणूक होत आहे. त्यामुळे गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारपासून निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.

- चौकट

चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम

उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले. अपेक्षित चिन्ह मिळण्यासाठी अनेकांनी देवाला साकडे घातले होते. मात्र, चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम असे वातावरण दिसले. अनेकांना अपेक्षित चिन्ह न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा होती. तर काहींच्या अपेक्षित चिन्ह मिळाल्याचा आनंद होता.