शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले ...

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे यासाठी १६ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या प्रश्नाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी पत्र तयार केले असून, लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातून टेंभू उपसा योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्याला जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कलेढोण गावापासून या योजनेचे पाणी जात असूनही, या भागाला आजपर्यंत या पाण्याचा लाभ कधी मिळाला नाही. याठिकाणी हजारो एकर कोरडवाहू शेती आहे. येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी व नगदी पीके घेतात. मात्र सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हातातोंडाला आलेले पीकही अनेकदा वाया जाते.

कमी पाण्यावर व माळरानावर येणारे पीक म्हणून प्रारंभी या भागातील शेतकरी द्राक्ष बागांकडे वळाले. आयुष्यभर कमावलेला पैसा बागेसाठी खर्च केला. त्यातून उदरनिर्वाह व परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रसंगी विकत पाणी घेऊन येथील शेतकरी द्राक्ष बागा जगवत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष या भागातून निर्यात होत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातील शेतकरी, ग्रामस्थ टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

या परिसरात पाण्यासाठी अनेक लहान मोठी आंदोलने झाली ; परंतु शासन दरबारी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, अनफळे पडळ, औतरवाडी, कठरेवाडी या ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी लेखी पत्र तयार केले असून लवकरच ही पत्रे घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अजित पवार भेट घेणार आहे.

(चौकट)

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी या भागातील ग्रामस्थांनी राजकारण विरहीत लढा उभारला आहे. त्यामुळे या लढ्याचे सर्वसामान्य ग्रामस्थही नेतृत्व करत आहे. शासनाने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे तरच या भागाचा विकास होईल.