शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्ह्यातून १५० बसेसची वारी!

By admin | Updated: July 28, 2015 23:23 IST

एसटीची बांधिलकी : अष्ठमीपासून अहोरात्र पुरविली जाते भाविकांना सुविधा

सातारा : ‘पाउले चालती पंढरीची वाट...’ म्हणत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून वैष्णवांच्या भागवत पताका घेऊन ‘ज्ञानोबा माउली तुकाराम... विठोबा रखुमाई...’ च्या जयघोषात दिंड्या पंढरपूरला दाखल होत असल्या तरी वारकऱ्यांच्या सेवेत एसटीने कोणतीही कसूर सोडलेली नाही. सोमवार व मंगळवारी दोन्ही दिवस १५० गाड्यांनी फेऱ्या केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाची एसटी सर्वसामान्यांची लाडकी आहे. त्यामुळे तिला ‘गरीबरथ’ म्हणूनही ओळखला जातो. एसटी आणि गरिबांचं जसं नातं आहे, त्याचप्रमाणे वारीमध्ये सहभागी होणारेही सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कष्टकरी वर्ग आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताला शोधत असतात. त्यामुळेच प्रत्येक वारकऱ्याची सेवा केली जाते.विठोबाच्या दर्शनाला निघालेल्या वयोवृद्ध वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कंबर कसली आहे. सातारा विभागातील अकरा आगारांतून जादा गाड्या सोडल्या होत्या. विभाग नियंत्रण धनाजी थोरात यांनी महिना भरापासून पूर्व तयारी केली होती. सर्व दिंड्यांनी प्रस्थान केल्यानंतर तीन-चार दिवसांनी हे आॅपरेशन सुरू झाले. यामध्ये नवमी शनिवार, दि. २५ रोजी नवमीला ६८ गाड्या, दशमी रविवार, दि. २६ रोजी ६९, एकादशी सोमवार, दि. २७ रोजी १४८ तर बारस मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४७ गाड्यांनी फेऱ्या केल्या होत्या. शनिवार ते सोमवार साताराहून पंढरपूरच्या दिशेला फेऱ्या वाढविल्या. तर एकादशीला सायंकाळनंतर सातारच्या दिशेने फेऱ्या केल्या आहेत. जे वारकरी दिंड्यांतून पंढरपूरला जात असतात ते विठोबाचे दर्शन घेऊन गावाकडे एसटीतून जात असतात. त्यामुळे आणखी काही दिवस गर्दी अशीच कायम राहील, अशी शक्यता विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)पुणे प्रादेशिक विभागाचे नेतृत्व साताऱ्याकडेपंढरपूरला राज्याच्या सर्वच विभागातून जादा गाड्या सोडल्या जातात. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतूनही जादा गाड्या सोडल्या आहेत. प्रादेशिक विभागाचे नेतृत्त्व करण्याचा मान साताऱ्याला मिळाला आहे. साताऱ्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक के. टी. पाटील हे नेतृत्त्व करत आहेत. तर सातारा विभागाची जबाबदारी एटीएस एस. एन. ननावरे यांच्याकडे आली आहे.