शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सैनिकांसाठी १५ लाखांची तरतूद!

By admin | Updated: February 26, 2016 00:47 IST

पालिका अर्थसंकल्प : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळाला दिलासा

सातारा : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सातारा नगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पात तब्बल १५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही तिप्पट वाढ करून तरतूद केल्याने सैनिक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सैनिकांच्या कल्याणासाठी स्वनिधी खर्च करणारी महाराष्ट्रातील सातारा ही एकमेव पालिका ठरली आहे. राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांच्या प्रयत्नामुळे पालिकेला आपल्या अर्थसंकल्पात सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करावी लागली. २०१२-१३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी सातारा पालिकेने बजेटमध्ये सैनिक कल्याणासाठी निधीची तरतूद करण्याचा आदेश दिला होता. माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी खर्च करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या होत्या; पण पालिकेने एका रुपयाचीही तरतूद केली नव्हती. शंकर माळवदे यांनी कडू-पाटील यांच्यानंतर आलेले जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांना लेखी पत्र देण्यात आले. पालिकेचे २०१३-१४ चे आर्थिक अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडे गेले असताना त्यांनी ते रोखले. माजी सैनिकांसाठी आर्थिक तरतूद करण्याचे आदेश त्यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यानंतर ही तरतूद खास बाब म्हणून करण्यात आली. त्यानंतर अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. या निधीच्या माध्यमातून सैनिकांचे हॉस्पिटल, मिलिट्री कॅन्टीन, मुला-मुलींचे वसतिगृह येथे सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दरम्यान, ही तरदूही कमी पडत असल्याने माळवदे यांनी पालिकेकडे १५ लाखांची तरतूद करण्याची विनंती केली होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेला या निधीची तरतूद करण्याची सूचना केली. त्यानुसार २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, माजी सैनिक रुग्णालयाचे कर्नल एम. एम. चव्हाण व मिलिटरी कॅन्टीनचे इन्चार्ज कर्नल शरद केंजळे यांनी पालिकेने केलेल्या तरतुदीबाबत समाधान व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी पालिकेच्या निधीच्या माध्यमातून सैनिक कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)