शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जिल्ह्यात ६७ टँकरने पाणीपुरवठा : ३५४ गावांत भीषण परिस्थितीे

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार सरी कोसळत असताना दुष्काळी भागात मात्र टँकर फेऱ्या सुरुच आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजमितीस ६७ टँकरने ३५४ गावे आणि वाडीवस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८७ गावे आणि २६७ वाड्यांचा समावेश असून तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ४९ हजार ७५ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यातच काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली होती. जिल्ह्यात गतवर्षी भयावह दुष्काळ होता, मात्र पाणलोट तसेच सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाल्यामुळे खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत होती. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. काही ठिकाणी मात्र भयावह परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७0 वाड्यातील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावातील ४६ हजार २६७ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १७ गावातील ३१ हजार ३७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात १४ टँकरने १५ गावे व ९७ वाड्यातील २६ हजार ९१0 लोकांना तर वाई तालुक्यात १ टँकरने १ गावातील २ हजार ९४९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) विहिरींचे अधिग्रहणजिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ६१ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २४, खटाव २६, कोरेगाव २, खंडाळा ४, फलटण ३, वाई १ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.