प्रदीप यादव -- सातारा -डॉ. बाबासाहेबांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे हे १२५ वर्ष साताऱ्यात जल्लोषात साजरे झाले. शहरातील आनंदनगर-बुधवार पेठ येथील युवकांनी तब्बल १२५ किलोचा केक तयार करून चक्क ट्रॅक्टर ट्रॉलीतून त्याची जोरदार मिरवणूकही काढली. त्यानंर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हा केक कापून मोठया कौतुकानं जवळपास एक हजार लोकांना वाटला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. विद्वत्तेच्या नभांगणात भरारी घेतली ती सातारच्या मातीतूनच... म्हणून यंदा कुणी १२५ व्याख्यांनाचा संकल्प केला तर कुणी डॉ. आंबेडकरांची १२५ फुटी रांगोळी रेखाटली. साताऱ्यातील आनंदनगर, बुधवार पेठ येथील जयभीम युवा सोशल गु्रपच्या (संस्था) वतीने दरवर्षी हटके पद्धतीने भीम जयंती साजरी करण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर आधारित देखावे सादर केले जातात. यंदाच्या जयंतीला १२५ वर्षे झाल्याची किनार लाभली आहे आणि म्हणूनच या मंडळाच्या सभासदांनी यंदा वेगळं काही तरी करण्याचा विचार केला होता. हे वर्ष कायमस्वरूपी लक्षात राहावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकवर्गणीतून तब्बल १२५ किलो वजनाचा आणि सहा फूट उंचीचा केक बनवून घेतला.बेकरीतून हा केक जयंतीस्थळापर्यंत नेण्यासाठी खास ट्रॉली बनविण्यात आली होती. जयभीम युवा सोशल ग्रुपचे अध्यक्ष अमित वाघमारे यांच्यासह आकाश कांबळे, श्रीकांत कांबळे, नीलश कांबळे, अभिजित वाघमारे, सिद्धार्थ वानखेडे, रोहित वीरकायदे, मनोज कांबळे, केतन जाधव आदी पदाधिकारी, कार्यकत्यांनी अशी अनोख्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा केला. २७ हजारांचा सहा फुटी केकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून १२५ किलो वजनाचा केक बनविण्यात आला. यासाठी सुमारे २७ हजार रुपयांचा खर्च आला. सहा फूट उंचीचा हा केक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. शेकडो नागरिकांचे तोंड गोडडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघण्यापूर्वी ग्रुपच्या सभासदांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर उपस्थित शेकडो नागरिकांना केकचे वाटप करून जयंतीदिनी सर्वांचे तोंड गोड केले.३ दिवस .... ६ कारागीर१२५ किलो वजनाचा एवढा मोठा केक बनविणे सोपे काम नव्हते.यासाठी येथील चकोर बेकरीचालक सारंग यांच्यासह अनुभवी ६ कारागीरांनी ३ दिवस अथक परिश्रम घेऊन केक बनविला. विविधरंगी पाच मनोरे असलेल्या केकवर आकर्षक नक्षीकामही करण्यात आले होते.
महामानवाच्या जयंतीसाठी बनविला तब्बल १२५ किलोचा केक!
By admin | Updated: April 15, 2016 00:48 IST