शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला १२ वर्षे कारावास; जिल्हा न्यायालयाचा निकाल

By दत्ता यादव | Updated: March 2, 2024 20:11 IST

कोरेगाव तालुक्यातील घटना

दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संतोष आबासो भोईटे (वय ५२, रा. तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव) याला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश  के. व्ही. बोरा यांनी १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, पाच वर्षांच्या पीडित बालिकेला २८ जुलै २०१६ रोजी आरोपी संतोष भोईटे याने 'तुला चॉकलेट देतो,' असे म्हणून तिच्या हातात १० रुपयांची नोट दिली. त्यानंतर तिला एका ठिकाणी नेऊन त्याने अत्याचार केला. हा प्रकार बालिकेने आईला सांगितल्यानंतर वाठार पोलिस ठाण्यात संतोष भोईटेवर पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. निकम यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित बालिका, तिची आई, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञ तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सदर केलेला पुरावा या प्रकरणामध्ये महत्त्वाचा ठरला. घटनेवेळी पीडित बालिकेचे वय ५ वर्षांचे, तर आरोपीचे वय ४५ वर्षे होते. सध्या आरोपीचे वय ५२ आहे. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून आरोपी संतोष भोईटे याला न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास तसेच २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मंजूषा तळवलकर यांनी काम पाहिले.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शेळके तसेच वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी हवालदार प्रकाश चव्हाण यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार शशिकांत गोळे, पोलिस अंमलदार गजानन फरांदे, हवालदार मंजूर मणेर, हवालदार शेख, कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची..

आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात शारीरिक दुखापत झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले हाेते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्यावर उपचार केल्यानंतर तिची प्रकृती सुधारली. या खटल्यात न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ज्ञांची साक्ष महत्त्वाची ठरली.   

टॅग्स :Courtन्यायालय