शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी १२ जणांवर गुन्हा

By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड करून

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड करून रखवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला.‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे भागीदार महादेव माळी यांना दोन दिवसांपूर्वी मोबाईलवर फोन आला. ‘सैदापूरमधील तुझी साईट सुरू ठेवायची असेल, तर मला भेट, मी प्रतापसिंहनगरातील मनोजभाई बोलतोय,’ असे सांगून त्याने माळी यांना तंबी दिली. एवढ्यावरच न थांबता सायंकाळी १० ते १२ जणांनी तोंडाला रुमाल बांधून सैदापूर येथील ‘समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच यावेळी रखवालदार प्रकाश जाधव यांनाही मारहाण करण्यात आली. सुमारे १० ते १५ मिनिटांत हल्लेखोरांनी तोडफोड करून पलायन केले. या प्रकल्पामध्ये मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचे निकटवर्तीयही आहेत. त्या हल्लेखोरांनी खाकीला सोडले नाही. रात्री उशिरा महादेव माळी यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १२ जणांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञातांवर तोडफोड, मारहाण आणि एक लाखाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत. माळी यांना ज्या मोबाईलवर फोन आला होता, त्या मोबाईल नंबरवरून संबंधित हल्लेखोरांचा शोध घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)