शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातून १२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:39 IST

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी ...

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहेत. आज, शुक्रवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील, प्राची नरेंद्र पाटील (शिवसेना), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), सहदेव ऐवळे (वंचित बहुजन आघाडी), आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), सागर भिसे, शैलेंद्र वीर, किशोर धुमाळ, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी डमी म्हणून आ. शशिकांत शिंदे यांनी तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यासाठी डमी म्हणून डॉ. प्राची पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदार संघातील राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध शिवसेना या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिंदे यांच्या अर्जामुळे चर्चेला उधाणसातारा लोकसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या वतीने एक व अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार उदयनराजे भोसले यांचा डमी म्हणून त्यांनी अर्ज दाखल केल्याचे राष्टÑवादीने सांगितले असले तरी कार्यकत्यांमध्ये मात्र उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. ५) उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर ८ तारखेला अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे.