शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१०,६६६ सातारकर म्हणतात, कोणीच नको

By admin | Updated: October 20, 2014 22:36 IST

विधानसभा निवडणूक निकाल : लोकसभेच्या तुलनेत नोटाचा प्रभाव वाढला

मोहन मस्कर-पाटील - सातारा जिल्ह्यात आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले असले तरी १०,६६६ मतदारांनी ‘नोटा’ तथा ‘वरीलपैकी कोणीही नको’ यास पसंती दिली आहे. सर्वाधिक ‘नोटा’चा वापर सातारा विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी वापर पाटण विधानसभा मतदारसंघात झाला आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला नोटाचा प्रभाव वाढला आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत बुधवार, दि. १५ रोजी मतदान झाले. यावेळी ८७ उमेदवार आमदारकीसाठी नशीब आजमावत होते. विधानसभा निवडणुकीसाठी आठही विधानसभा मतदारसंघांत २३ लाख ५९ हजार ४१३ इतकी मतदारसंख्या होती. मात्र, यापैकी फक्त १५ लाख ९५ हजार ७९७ इतक्या लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १० हजार ६६६ सातारकरांनी ‘वरीलपैकी कोणीही नको’ असे सांगत ‘नोटा’चे बटण दाबले. विशेष म्हणजे, ‘नोटा’चा सर्वाधिक वापर सातारा तर सर्वात कमी पाटण मतदारसंघात झाला आहे. देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांच ‘नोटा’चा वापर झाला. लोकांना मतदान करण्याचा अधिकार असला तरी त्यांना त्याच्याजोडीला नकाराधिकारही असावा, ही यापाठीमागची संकल्पना होती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याची सक्षमपणे अंमलबजावणीही करण्यास सुरुवात झाली. ‘नोटा’ म्हणजे ‘वरीलपैकी कोणी नाही’ (नन आॅफ दि अबोव्ह) असा धरला जातो. कोणत्याही मतदान यंत्राच्या अगदी शेवटी नोटाचा पर्याय देण्यात आला आहे. कोणत्याही मतदान यंत्रावर पंधरा उमेदवार आणि नोटा अशी मिळून सोळाच नावे बसू शकतात. मात्र, जर सोळा उमेदवार असले तर ‘नोटा’साठी स्वतंत्र मतदान यंत्र दिले आहे. लोकसभा निवडणुकीत १०,५५२ ‘नोटा’लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच देशात ‘नोटा’चा वापर झाला. सातारा लोकसभा मतदारसंघात फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही. मात्र, समाविष्ट असणाऱ्या कोरेगाव, सातारा, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण आणि वाई या सहा विधानसभा मतदारसंघांत त्याचा वापर प्रभावी झाला होता. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ‘नोटा’चा वापर १०,६६६ सातारकरांनी केला आहे. यामध्ये फलटण आणि माण मतदारसंघातील मतदारांचा समावेश आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या सहाही मतदारसंघांत ८,१९४ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला. लोकसभा निवडणुकीत मात्र, १०,५५२ लोकांनी ‘नोटा’ला पसंती दिली होती. गडचिरोली मतदारसंघात ‘नोटा’चा सर्वाधिक वापरमहाराष्ट्रात सर्वाधिक गडचिरोली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १७,५१० मतदारांनी नोटाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, येथील भाजपचे विजयी उमेदवार डॉ. देवराव होली यांना ७0,१८५ इतके मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांना १८,२८0 इतकी मते आहेत आणि विशेष म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ आहे. मतदारसंघनिहाय ‘नोटा’मतदारसंघनोटाफलटण१६५६वाई१३२५कोरेगाव१९९१माण८१६कऱ्हाड उत्तर१0५६कऱ्हाड दक्षिण९३९पाटण५५0सातारा२३३३एकूण१0६६६