शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी शाळांचे ‘मार्केटिंग’ गरजेच

By admin | Updated: January 19, 2015 00:24 IST

बोरसे-पाटील : शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशने

सांगली : जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असतानाही, त्याचे मार्केटिंग केले जात नाही. या शाळांकडे मुलांचा ओढा वाढण्यासाठी शाळांच्या गुणवत्तेची जाहिरातबाजी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेशाध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील यांनी केले.येथे आज (रविवार) प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोरसे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर होते.बोरसे-पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत असताना, याचा गैरप्रचार होत आहे. शिक्षकांनीही कोणतीही तडजोड न करता दर्जेदार शिक्षण देण्यासासाठी कटिबध्द व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. विश्वनाथ मिरजकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत किरण गायकवाड यांनी केले. उदय शिंदे, रमेश साबळे आदींची भाषणे झाली. जिल्ह्यातील बारा महिला प्राथमिक शिक्षिकांचा व स्वच्छ व सुंदर शाळांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण पाटील, शशिकांत भागवत, ताजुद्दीन मुलाणी, आप्पासाहेब जाधव, अरविंद पाटील उपस्थित होते.समितीच्या जिल्हाध्यक्षपदी सयाजी रघुनाथ पाटील (शिगाव, ता. वाळवा) यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी बाबासाहेब पुंडलिक लाड यांची निवड करण्यात आली. महिला जिल्हाध्यक्षपदी अंजली कमाने यांची निवड करण्यात आली. दोन्ही संघटनांची कार्यकारिणी पंधरा दिवसात जाहीर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिंधी)थोरात गटाला हादराप्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनात सांगली जिल्ह्यातील संभाजी थोरात गटातील नऊ सदस्यांनी आज शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. राज्याचे अध्यक्ष काळुजी बोरसे-पाटील व विश्वनाथ मिरजकर यांच्या उपस्थितीत थोरात गटातील सदस्यांनी प्रवेश केला. यामध्ये विजय चव्हाण, तुकाराम पवार, परशुराम चव्हाण, प्रमोद सुतार, नवनाथ पोळ, बालाजी मस्के, सचिन वाकडे, रेवणसिध्द होनमोरे, विशाल खाडे या शिक्षकांचा समावेश आहे.