शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्ष पदासाठी नेत्यांना साकडे

By admin | Updated: August 29, 2014 23:13 IST

जगताप गटाची गोची : उपाध्यक्षपद वाळव्याला जाण्याची शक्यता

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी २१ सप्टेंबर रोजी होणार आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना सावंत (सावळज), मनीषा पाटील (आटपाडी), वैशाली नाईक (शिराळा), योजना शिंदे (मणेराजुरी), स्नेहल पाटील (येळावी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या इच्छुकांनी अध्यक्षपदाची आपल्यालाच संधी मिळण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या तरी लिंबाजी पाटील (तांबवे, ता. वाळवा) या एकमेव आहेत. या पदाधिकारी निवडीत विलासराव जगताप समर्थक सदस्यांची गोची होण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडी मुदतीतच होणार की मुदतवाढ मिळणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडीच्या तारखा शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्या आहेत. पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी १४ रोजी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाल २० सप्टेंबरला संपत असून, २१ रोजी नवीन निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील बदल्या राजकीय परिस्थितीत जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे ९ सदस्य त्यांच्या नेत्यांसोबत भाजप—शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र केंद्र शासनाच्या पक्षातर बंदी कायद्यातील दुरुस्तीमुळे त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा देऊनच बाहेर पडावे लागणार आहे.  परंतु, एवढे धाडस सदस्य निश्चित दाखविणार नाहीत. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीच बाजी मारण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या कल्पना सावंत, मनीषा पाटील, वैशाली नाईक, योजना शिंदे, स्नेहल पाटील इच्छुक आहेत. सावंत, पाटील, नाईक प्रबळ दावेदार आहेत. (वार्ताहर)