शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची माधवनगरच्या सरपंच, उपसरपंचास नोटीस

By admin | Updated: April 20, 2016 23:50 IST

बेकायदेशीर व्यवहार : एका सदस्यासही दणका

माधवनगर : माधवनगर (ता. मिरज) येथील ग्रामपंचायतीमधील बोगस ठराव व बेकायदेशीर खरेदी व्यवहार व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी माधवनगरच्या सरपंच नंदाताई कदम, उपसरपंच सुनील जाधव व सदस्य शब्बीर मुल्ला यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे तिघांचे पद धोक्यात आले आहे. याबाबत सांगली सुधार समिती व माधवनगर स्वाभिमानी विकास आघाडीने तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस हा दणका दिला आहे. माधवनगर गट नं. ५७ चे बिगरशेती न करता प्लॉटच्या खरेदी व्यवहारांच्या नोंद ग्रामपंचायत दप्तरी न. नं. ८ ला घेतल्या आहेत. तसेच जागा गावठाण हद्दीमध्ये नसताना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून महसूल संहितेचा भंग केला आहे. हा विषय सभेच्या नोटिसीत घेण्यात आला नाही. बेकायदेशीर दाखले देण्यात आले. या नोंदी बेकायदेशीर व अनियमित आहेत. पदाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे शासनाची दिशाभूल करून शासनाचा महसूल बुडवून लोकांना भूखंड विकले आहेत. जाणीवपूर्णक लोकांची फसवणूक केली आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामसदस्य या नात्याने अवैध ठरावास जबाबदार आहेत. त्यामुळे सदस्य पदावरुन काढून टाकण्याची कारवाई का करण्यात येऊ नये, यासाठी विभागीय आयुक्तांकडे लेखी खुलासा सात दिवसात सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. (वार्ताहर) सुधार समिती, स्वाभिमानी आघाडीचा लढायापूर्वी पंचायत समितीने या प्रकरणाची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी मलमे यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी सरपंच, उपसरपंच व सदस्यही जबाबदार असून, त्यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याचे कारण देत जिल्हा सुधार समिती व माधवनगर स्वाभिमानी विकास आघाडीने तक्रारी केल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही नोटीस देण्यात आल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे समितीने दिली. त्यावर अ‍ॅड़ अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, बाळासाहेब मगदूम, गोविंद परांजपे, अंकुश केरीपाळे, दत्तात्रय पाटील, विनायक पवार, अ‍ॅड़ राजाराम यमगर, आप्पा तिमगोळ, विजय सोडगे, बाळासाहेब मगदूम, निरंजन राजमाने, किरण पवार, दीपक कांबळे आदींची नावे आहेत.