शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद बंदचा डाव

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

सदस्यांचा आरोप : अभियांत्रिकी योजना कृषी विभागाकडे वर्ग

सांगली : राज्य शासनाच्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य शासनाकडील कृषी विभागासह अन्य विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्याचा सपाटा लावून जिल्हा परिषद बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी समितीच्या बैठकीत केला. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील अभियांत्रिकी योजना राज्य शासनाच्या आत्मा विभागाकडे वर्ग केली आहे. यामुळे सदस्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अभियांत्रिकी योजना जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा ठरावही करण्यात आला. सभापती राजेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. कृषी समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील कृषी अभियांत्रिकी योजना राज्य शासनाकडे वर्ग केल्यावरून वादळी चर्चा झाली. जिल्हा परिषद बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव असून तो प्रकार उधळून लावला जाईल, असा इशाराही सदस्यांनी दिला. राज्य शासनाकडील योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याऐवजी येथीलच कृषी अभियांत्रिकी योजना वर्ग करून अन्याय केला जात आहे. राज्य शासनाकडील कृषी विभागाच्या योजनांचा जनतेपर्यंत लाभ मिळत नाही. कोणत्याही योजनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही, असा आरोपही सदस्यांनी केला. डाळिंब शेतीकडे शेतकरी वळत असतानाही केंद्र आणि राज्य शासनाकडून तुटपुंजे अनुदान दिले जात आहे. १५०० हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली असताना शासनाकडून केवळ ५० हेक्टरसाठीच अनुदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे डाळिंब बागांसाठी शासनाने वाढीव अनुदान देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आल्याचे राजेंद्र माळी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हवामानावर आधारित पीक विमा योजनेस शासनाने ३० जुलैपर्यंत वाढ देण्याच्या मागणीचा ठराव केला आहे. तसेच बायोगॅसच्या अनुदानात बाराशे रूपयांची वाढ केली आहे. सौरपथदिवे आणि सौर कंदिलासाठी शासनाकडून एक कोटींचा निधी आला आहे. या अनुदानातून सौरपथदिवे तीनशे आणि सौरकंदील एक हजार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)