शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद घोटाळा; कारवाई करा : बागडे

By admin | Updated: April 13, 2016 00:42 IST

अधिकाऱ्यांच्या निलंबनाची नाईक यांची मागणी

सांगली : जिल्हा परिषदेच्या बॅटरी, स्प्रे-पंप, शिलाई यंत्र व मुलींच्या सायकल खरेदीतील घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने पुणे विभागीय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल दिल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी दिले. दरम्यान, आ. शिवाजीराव नाईक यांनी जिल्हा परिषदेतील दोषी अधिकाऱ्यांना निलंबीत करून चौकशी करण्याची मागणी केली.शिराळ्याचे आमदार नाईक यांनी लक्षवेधी मांडताना म्हटले आहे की, जिल्हा परिषद कृषी विभागाने बाजारपेठेतील बॅटरी, स्प्रे-पंपाची किंमत लक्षात घेतली नाही, याकडे खरेदी समितीने दुर्लक्ष करून पडगीलवार अ‍ॅग्रो या पुरवठादारास ४५२९ रुपयांप्रमाणे बॅटरी, स्प्रे-पंप पुरवठा करण्याचा आदेश दिला आहे. अधिकाऱ्यांनी पुरवठादाराचे हितरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. बाजारभावापेक्षा प्रति नग १५३१ रुपये जादा दराने बॅटरी, स्प्रे-पंपाचा पुरवठा झाला आहे. त्यातून जिल्हा परिषदेस वीस लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शिलाई यंत्रांची खरेदी प्रक्रियाही संशयास्पद आहे. यामध्ये सुमारे १४ लाख १० हजार रुपयांचा गोलमाल झाला आहे. याच विभागाकडून सायकल खरेदीही केली असून, यामध्येही ठराविक पुरवठादारास निविदा मिळावी म्हणून अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. जत येथील हातपंप दुरुस्तीसाठीच्या साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. यावेळी सभापती हरिभाऊ बागडे यांनी, अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.परंतु, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व विधानसभा सभापती बागडे यांच्या उत्तरावर नाईक यांचे समाधान झाले नाही. नाईक यांनी जिल्हा परिषद निविदा मॅनेजमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी केली.