लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवणार असून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी केले.
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश मोहिते, रघुनाथ कदम, आप्पासाहेब बिराजदार, सुजय शिंदे, बाबासाहेब कोडग, प्रकाश जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
विक्रम सावंत म्हणाले, डॉ. पतंगराव कदम व मोहनराव कदम यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करणार. माझ्यासारख्या दुष्काळी तालुक्यातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष पोपटराव महिंद, बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, निवृत्ती जगदाळे, महेश कदम, सुनील पाटील, आनंदराव पाटील, शोभाताई मोहिते, नयना शिंदे, सयाजी जाधव उपस्थित होते.