शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

जिल्हा परिषदेतील सत्तेत स्वारस्य नाही

By admin | Updated: February 27, 2017 00:08 IST

जयंत पाटील; काँग्रेसला उशिरा शहाणपण सुचले; काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीलाच टार्गेट

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव होता; पण काही ठिकाणी आघाडी झाली, तर काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच एक नंबरचा शत्रू मानत होते. आता दोन्ही पक्षांच्या आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. राष्ट्रवादीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाबद्दल ते म्हणाले की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी इच्छुक नाही. जनतेने आम्हाला विरोधात बसविले आहे. जिल्'ात जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यात आम्हाला यश आले नाही. निवडणुकीनंतर संख्याबळाची जमवाजमव करून जनमताचा अनादर करण्याची आमची इच्छा नाही. काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जिल्हा परिषद सत्तेसाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, ज्यांना सत्तेसाठी हालचाली करायच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मतांची गोळाबेरीज आम्हाला करायची नाही. पण काँग्रेसला प्रयत्न करायचे असल्यास त्यांनी ते करावेत. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांनी आघाडी करावी, अशी भूमिका आमची होती. त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्नही केले. पण जिल्हास्तरावरील नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच शत्रू मानत होते. आता निकालानंतर काँग्रेसला शहाणपण आले आहे. पण जोपर्यंत काँग्रेस हा भाजपला शत्रू मानत नाही, तोपर्यंत दोन्ही पक्षांच्या आघाडीला काहीच अर्थ नाही. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करणार का? याबद्दल विचारता ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. योग्य वेळ आल्यानंतर पाहू, असे पाटील म्हणाले. बंडखोरांना थारा नाही वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेल्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यावरील कारवाईची प्रक्रिया पार पडली आहे. त्याबरोबरच बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांना आम्ही सोबत घेणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.