शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

सांगली : जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठीच्या आरक्षणातील बदलामुळे ...

सांगली : जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठीच्या आरक्षणातील बदलामुळे निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील परिपत्रक सोमवारी (दि.२८) प्रसिद्ध करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांमध्ये गट क संवर्गातील जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. आरोग्य विभागात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्यपर्यवेक्षक या जागा भरल्या जाणार होत्या. त्यासाठीची जाहिरातही मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केली होती. यादरम्यान एसईबीसी प्रवर्गाचा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी रद्द केला. त्यामुळे त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागा निरर्थक ठरल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील जागांच्या संख्येत बदल झाले आहेत.

अनुकंपा तत्त्वावरील जागांवर नियुक्त्यांचे प्रमाण काही कालावधीसाठी १० टक्क्यांवरून २० टक्के केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदांनी त्या-त्या वेळी भरती केली आहे. त्याचाही परिणाम खुल्या प्रवर्गाची पदसंख्या कमी होण्यावर झाला आहे. भरती प्रक्रियेत दिव्यांगांचाही समावेश करायचा आहे. या बाबी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या या भरती प्रक्रियेत बदल करून नव्याने प्रक्रिया राबवण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला.