शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कवलापुरात युवकाची आत्महत्या

By admin | Updated: June 4, 2017 01:14 IST

पत्नीला विष पाजले : आजारपणाला कंटाळून कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पत्नीला विष पाजून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर कृष्णा भोसले (वय २९) व पूजा शंकर भोसले (२५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. कवलापूर (ता. मिरज) येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली. शंकरला कर्करोगाची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्याला दोन महिने जगणार असल्याचे सांगितले होते, यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.कुंभारी (ता. जत) येथील शंकर भोसले गेल्या अनेक वर्षांपासून कवलापुरातील मायाक्कानगरमध्ये आई, वडील, पत्नी व मुलांसोबत राहत होता. त्याचा भाऊ कुटुंबासह गोव्यात नोकरी करतो. शंकरला पोलीस भरती व्हायचे होते; पण तो झाला नाही. सध्या तो कुपवाड एमआयडीसीत एका कंपनीत नोकरी करीत होता. त्याला मयुरी (४ वर्षे) व दर्शन (२ वर्षे) अशी दोन मुले आहेत. महिन्यापूर्वी शंकरची प्रकृती बिघडली होती. त्याने डॉक्टरांकडे तपासणी करून घेतली. यामध्ये त्याला कर्करोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. डॉक्टरांनी ही बाब त्याला बोलून दाखविली, तसेच तुझे दोन-तीन महिने आयुष्य आहे, असे सांगितले होते. तेव्हापासून तो चिंताग्रस्त बनला होता. पत्नी पूजाला त्याने हा प्रकार सांगितला. तेव्हा तिलाही धक्का बसला. यातून दोघांनी जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेऊन आत्महत्येचा मार्ग निवडला. शनिवारी शंकरचे वडील मजुरीसाठी शेतात गेले होते. आई परगावी गेली होती. शंकरची दुपारी चार ते रात्री बारा अशी ड्युटी होती. त्यामुळे तो घरी होता. मुले घराबाहेर खेळायला गेल्यानंतर त्याने पत्नीच्या दोन्ही हाताच्या शिरा कापल्या. तसेच तिला विष पाजले. पत्नी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने घराच्या छताच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतला. मुले पाणी पिण्यासाठी घरी आली, त्यावेळी आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ते आक्रोश करीत घराबाहेर आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. दोघांनाही तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी शंकरला मृत झाल्याचे घोषित केले. पूजावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपनिरीक्षक गणेश शिंदे, हवालदार संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आत्महत्येपूर्वी चिठ्ठीशंकर भोसले याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यामध्ये त्याने ‘मी व पूजा विष पिऊन आयुष्य संपवित आहे. माझी मुले मयूरी व दर्शनचा सांभाळ करा. माझा भाऊ नंदू खूप चांगला आहे. मी पोलीस भरती झालो नाही, पण माझा भाचा अनिल याने भरती व्हावे. माझ्या आई, वडिलांनी खूप कष्ट केले आहेत. त्यांनी आम्हाला माफ करावे’, असे लिहिले आहे. चिठ्ठीतील हा मजकूर पोलिसांनी नातेवाइकांना वाचून दाखविला. चिठ्ठीत कर्करोगाची लागण झाल्याबाबत कोठेही उल्लेख नाही.