शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

तरुणांनी आपली संस्कृती जपावी

By admin | Updated: November 27, 2015 00:07 IST

सिंधुताई सपकाळ : ‘आदर्श’ मातांचा कवठेपिरानमध्ये गौरव

दुधगाव : तरुणांनी आपल्या संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले. कवठेपिरान (ता. मिरज) येथे बुधवारी सायंकाळी सपकाळ यांच्याहस्ते ‘आदर्श’ मातांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. जयंत पाटील होते. कवठेपिरान येथे जयंत पाटील युथ फौंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सपकाळ पुढे म्हणाल्या, आजच्या धावत्या युगात संगणकामुळे जनजीवन धावपळीचे होत चालले आहे. दिवसेंदिवस धावत्या युगात संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. तरुण आणि तरुणींनी आपली संस्कृती जपण्याची गरज आहे. आजच्या युगामध्ये सपकाळ यांनी आपल्या जीवनचरित्राचा इतिहासही तरुणांच्या डोळ्यासमोर ठेवला. त्यांनी ‘आई’ या विषयावरही व्याख्यान दिले. तसेच या परिस्थितीत परंपरा व संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्या जपण्यासाठी मातांनीही लक्ष दिले पाहिजे, असे आवाहनही सिंधुतार्इंनी केले. यावेळी सिंंधुतार्इंनी आपला जीवनपटही उलगडला. कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात १९८५ मधील सिंधुताई सपकाळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व जयंत फौंडेशनला मदत करण्याची ग्वाहीही दिली. तसेच प्रा. संग्राम जाखलेकर व अवधूत पाटील यांनी गावाच्या विकासासाठी जयंत फौंडेशन सतत कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील (बापू), उद्योजक भालचंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रमोद आवटी, अरुण साळुंखे, सचिन पाटील, रघु दिडे, एम. डी. खंबाळे, बाबूराव कालेकर, गजानन पाटील, प्रताप गुरव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)यांचा झाला गौरव या कार्यक्रमात श्रीमती मंगल पाटील, सौ. प्रमिला जैनापुरे, श्रीमती कल्पना जाधव, श्रीमती वत्सला माणगावे, सौ. आफसाना मुजावर, श्रीमंती आनंदीबाई दिंडे आदी आदर्श मातांचा यावेळी गौरव करण्यात आला.