लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : भारतीय स्वातंत्र्यलढा सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी घटना आहे. या घटनातून स्फूर्ती घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याकरिता विद्यार्थी व युवा वर्गाने कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे यांनी केले. आष्टा येथे ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त जायंट्स ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विराज शिंदे म्हणाले, कोरोना महामारीमध्ये समीर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जायंट्स ग्रुपने भरीव योगदान दिले आहे. हे कौतुकास्पद आहे.
जायंट्स ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन गायन व वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. अध्यक्ष समीर गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव प्रा. सूर्यकांत जुगदर यांनी आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष प्रा. विलासराव पाटील, रामनारायण उंटवाल, एन. डी. कुलकर्णी, राजेंद्र सावंत, प्राचार्य जयपाल शेटे, कमल उंटवाल आदी उपस्थित होते. नितीन मोरे, शिराज मुजावर, अजय मोरे, रमेश माळी यांनी उपक्रमांचे नियोजन केले.