शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बावचीनजीक अपघातात पडवळवाडीच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथे इस्लामपूर जोड रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. विजय ...

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथे इस्लामपूर जोड रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. विजय उत्तम चव्हाण (वय ३२, रा. पडवळवाडी, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडला. या अपघाताची नोंद रात्री आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.

विजय चव्हाण हा शुक्रवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १० सीई ७९२९) पडवळवाडीहून आष्टा येथील शिंदे मळा येथे नातेवाइकांकडे थांबलेल्या वडिलांना घरी आणण्यासाठी जात होता. यावेळी बावची येथील शिरोळकर मळ्यानजीक अज्ञात ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विजयच्या चेहऱ्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरसह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

रात्रीची वेेळ आणि पाऊस असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. यामुळे अपघातातील ट्रॅक्टरबाबत अधिक माहिती समजली नाही. अपघाताच्या आवाजाने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृत विजयच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्याने त्याची प्रथम ओळख पटली नाही. मात्र त्याचा या परिसरात नेहमी वावर असल्याने त्यांची दुचाकी पाहून तो पडवळवाडी येथील असल्याचे समजले. यानंतर कुटुंबीय व नातेवाइकांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी आल्यावर त्याची ओळख पटली. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

आष्टा येथील डांगे कॉलेज परिसरात विजय चव्हाण याचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.