आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आष्टा-इस्लामपूर मार्गावर माजी आमदार.विलासराव शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरातील सर्वसामान्यांना लग्न, साखरपुडा यासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पालिकेच्यावतीने बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे. हा हॉल कोरोना संसर्गामुळे मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. तो हॉल पालिकेच्यावतीने पुन्हा सुरू करण्यात आलेला नाही. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने पूर्ववत हा हॉल सुरू करावा व नागरिकांची गैरसोय टाळावी. आष्टा शहरातील नागरिकांसाठी एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी केली. यावेळी प्रवीण वारे, राजू माने, सोमाजी डोंबाळे, प्रकाश सिद्ध, संदीप खोत, राकेश तेली, अविनाश वारे, अभिजित तानगे, आकाश कोरे, धनाजी सिद्ध, वैभव बावडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
आष्टा येथील विलासराव बहुउद्देशीय हॉल यापूर्वी चालविण्यास देण्यात आला होता. तो पुन्हा इतर कोणासही चालविण्यास देण्यात आलेला नाही. पालिकेने तातडीने स्वत: देखभाल दुरुस्ती करून चालवावा व नागरिकांना सवलतीच्या दरात भाडे आकारावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फोटो - १६०२२०२१-आयएसएलएम-आष्टा निवेदन न्यूज
आष्टा पालिकेच्या अधिकारी सारिका खोत यांना विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल सुरू करण्याबाबत निवेदन देताना शिवाजी चोरमुले, प्रवीण वारे, राजू माने, सोमाजी डोंबाळे, प्रकाश सिद्ध, संदीप खोत, राकेश तेली, अविनाश वारे, अभिजित तानगे, आकाश कोरे, धनाजी सिद्ध, वैभव बावडेकर उपस्थित होते.