शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वायफाय’साठी तरुणांची गर्दी

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

रात्री उशिरापर्यंत गर्दी---नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय ‘वायफाय’ करीत वाहवा मिळवली खरी, मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. फोर जी इंटरनेटचा वापर करण्यासाठी कार्यालयाचे आवार तरुणांच्या गर्र्दीने अक्षरश: फुलून जात आहे. दिवसभर पन्नासच्या घरात असलेली तरुणांची संख्या रात्री वाढत असून, रात्री दोनशे ते तीनशेजण ‘वायफाय’चा आनंद ‘लुटत’ आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका खासगी मोबाईल कंपनीच्या मदतीने ‘वायफाय’ सुविधा सुरु करण्यात आली. सेवा सुरु झाल्यापासून आजपर्यंत त्याचा वापर करणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढच होत आहे. सुट्टीच्या दिवसात तर नेहमी सुनसान असणारा या कार्यालयाचा परिसर सध्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या सेवेच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी, तरुणांनी या सेवेचा उपयोग करुन घेत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार खरोखरच अभ्यासासाठी तरुण या सेवेचा वापर करतात का? हा सवाल कायम आहे. नागरिकांच्या वाहनांवर अक्षरश: झोपून काही युवक नेटचा वापर करतात. त्यामुळे यावरून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. या सेवेचा तरुणांकडून अतिरेक होत असल्याची तक्रार आता खुद्द कर्मचारीच करीत आहेत. रात्री तर या कार्यालयाच्या परिसरात दोनशेहून अधिक युवकांचा राबता असतो. यात नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून अत्यंत सकारात्मक हेतूने या सेवेची सुरूवात केली असली तरी, मूळ उद्देश बाजूला पडत आहे. (प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत गर्दीवायफाय सेवेचा लाभ उठविण्यासाठी दिवसभर तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तळ’ ठोकून असतातच. शिवाय रात्री कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेनंतर तर खरी गर्दी या परिसरात होत आहे. रात्री किमान दोनशेहून अधिकजण या परिसरात या सेवेचा ‘लाभ’ घेत असल्याचे चित्र आहे.