शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

सांगलीत चाकू हल्ल्यात तरुण ठार

By admin | Updated: November 3, 2016 00:05 IST

चौघेजण जखमी : भांडण सोडविण्यास गेला अन् जिवाला मुकला

 सांगली : येथील न्यू टिंबर एरियातील भीमनगर परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचाच चाकूने वार करून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या वादावादीत अन्य चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत नरसूचा भाऊ विकी वाघमारे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात संतोष दादासाहेब ठोकळे, त्याचे साथीदार नितीन बापू ठोकळे व सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील (सर्व रा. भीमनगर) या तिघांवर खुनाचा संशय आहे. यातील संशयित संतोष ठोकळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष व त्याचे दोन साथीदार नितीन व सोनूसह भीमनगरमधील भीमकट्ट्यावर बसले होते. यावेळी संतोष दारूच्या नशेत होता. याच परिसरात राहणाऱ्या अक्काताई सनदी (वय ८०) रस्त्याने घरी निघाल्या होत्या. त्यांना पाहून संतोषने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. यातून त्यांच्यात वाद झाला. अक्काताईचा नातलग सूरज सनदी यानेही संतोषशी वाद घातला. संतोष व सनदी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आदर्श ऊर्फ नरसूला मिळाली. यावेळी तो घरात झोपला होता. त्याला कोणीतरी भांडण सोडविण्यासाठी बोलावून नेले. नरसू दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच संतोषने त्याच्याजवळील चाकू काढून त्याला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघात वाद सुरू असल्याने परिसरातील तरुणांनीही गर्दी केली होती. संतोष व नरसू यांच्यात झटापट झाली. यावेळी इतर तरुणही भांडण सोडविण्यासाठी धावले. नरसू मागे हटत नसल्याचे पाहून संतोषने त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण छातीवर चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत रोहित पुजारी, राहुल मुळके, विकी वाघमारे जखमी झाले. संतोष ठोकळे, नितीन ठोकळे व सोनू पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) चौकट बहिणीसाठी घेतले नवीन कपडे नरसूचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. तो कधी वाढप्याचे काम करी, तर कधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे. त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण मिळत असे. दिवाळी तोंडावर आल्याने तो चार ते पाच दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्वत:सह बहिणीसाठी नवीन कपडे घेतले होते.