शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

युवतींनी चोरट्यास बदडले

By admin | Updated: September 7, 2014 00:26 IST

बहादूरवाडीच्या मुली : सोन्याची चेन पळवणारा जेरबंद

इस्लामपूर : बहादूरवाडी (ता. वाळवा) येथील पाच महाविद्यालयीन युवतींनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भर वर्दळीच्या रस्त्यावर सोन्याची चेन हिसडा मारून पळवणाऱ्या चोरट्यास पाठलाग करून नागरिकांच्या सहाय्याने पकडले. त्यानंतर दुर्गेचा अवतार धारण केलेल्या रणरागिणींनी त्या चोरट्यास चोप दिल्याची घटना घडली. शहरात धूम स्टाईलने महिलांच्या अंगावरील दागिने लुबाडणारे चोरटे पोलिसांना सापडत नसले, तरी बहादूरवाडीच्या ‘बहाद्दूर’ पोरींनी हे काम करताना आपल्या मनगटातील ‘रग’ दाखविली.सारिका वसंत खोत (रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) या महाविद्यालयीन युवतीच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन या चोरट्याने पळवण्याचा प्रयत्न केला. अनिल संभाजी शिंदे (वय ३९, रा. गणपती पेठ, कऱ्हाड) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.याबाबत मिळालेली माहिती अशी, सारिका खोत ही मैत्रिणी सुप्रिया सुहास खोत, आरती संपत देसावळे, कोमल नागनाथ चन्ने व सुरेखा दत्तात्रय खोत (रा. सर्व बहादूरवाडी) यांच्यासमवेत सकाळी साहेअकराच्या सुमारास महाविद्यालयात जाण्यासाठी बसस्थानकावर उतरल्या. या घटनेवेळी सारिका ही दोन मैत्रिणींसमवेत पुढे होती, तर अन्य दोघी पाठीमागून येत होत्या. या प्रकारानंतर मुलींनी आरडा-ओरडा केल्यावर चोरट्याने हुतात्मा बॅँकेच्या शेजारील बोळातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मुलींचा पाठलाग व दंगा ऐकून तेथील सोमनाथ फल्ले व त्यांच्या साथीदारांनीही त्याचा पाठलाग केला. बोळातून पुढे जाण्याचा मार्ग बंद असल्याने चोरटा एका इमारतीवरून उडी मारून पुन्हा रस्त्यावर आला. तेथे त्याला जेरबंद करून या मुलींनी अक्षरश: लाथा-बुक्कयांनी व चपलाने मारहाण करीत बदडले. नागरिकांनीही त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर सारिका खोत हिने पोलिसात वर्दी दिली. (वार्ताहर)